Tata Nexon Facelift : अखेर नेक्सॉन फेसलिफ्ट भारतीय बाजारपेठेत लॉन्च, जाणून घ्या किती असेल किंमत?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tata Nexon Facelift : आघाडीची ऑटो कंपनी टाटा मोटर्सने काही दिवसांपूर्वीच नेक्सॉन आणि नेक्सॉन ईव्हीच्या फेसलिफ्ट आवृत्तीवरून पडदा हटवला आहे. आता कंपनीने या दोन्ही SUV लाँच केल्या आहेत. दरम्यान आपण या लोकप्रिय गाड्यांची किंमत जाणून घेणार आहोत. तुमच्या माहितीसाठी टाटा नेक्सॉन ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हींपैकी एक आहे. Tata Nexon आणि Nexon EV चे फेसलिफ्ट मॉडेल आज भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणार असून, त्याच्या किंमती देखील समोर आल्या आहेत.

टाटा ने स्मार्ट, स्मार्ट प्लस, प्युअर प्लस, क्रिएटिव्ह प्लस, फियरलेस आणि फियरलेस प्लस व्हेरियंटमध्ये नवीन नेक्सॉन सादर केले आहेत. टाटा पंचसाठी प्युअर आणि क्रिएटिव्ह ही नावे आधीपासूनच वापरात आहेत. नवीन Nexon आणि Nexon EV फेसलिफ्टसाठी बुकिंग आधीच सुरू आहे. आगामी SUV च्या फीचर्स सोबतच त्याची किंमत काय आहे हे आपण बघणार आहोत.

Tata Nexon EV स्पेसिफिकेशन

पूर्वीप्रमाणे, नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटर डिझेल इंजिनसह येईल. 5 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड मॅन्युअल किंवा 7 स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय पेट्रोल इंजिनमध्ये आहेत. तर दुसरीकडे, डिझेल इंजिन 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा 6 स्पीड AMT सह देण्यात आले आहे.

Tata Nexon EV फेसलिफ्ट वैशिष्ट्ये

टाटा आता Nexon EV मध्ये Gen2 इलेक्ट्रिक मोटर वापरत आहे. हे देखील 20 किलो हलके आणि लहान आहे. बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम (BMS) आणि लिक्विड कूलिंग सिस्टीममध्ये सुधारणा करण्यात आली आहे. Tata Nexon EV चा टॉप स्पीड 120 किमी/तास वरून 150 किमी/तास झाला आहे. याशिवाय, लाँग रेंज मॉडेल फुल चार्जमध्ये 465 किमी अंतर कापण्यास सक्षम असेल.

नवीन Tata Nexon EV किंमत

टाटा मोटर्सच्या Nexon Facelift एसयूव्ही कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 08.09 लाखांपासून सुरु होते, तर त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 12.99 लाख रुपये आहे.

-12L PETROL MT

SMART – 8,09,990, SMART+ – 9,09,990, PURE – 96,69,990, CREATIVE – 10.99.900, CREATIVE+ – 11,69,990, FEARLESS – 12,49,990

-12L PETROL AMT : STARTSAT – 11,69,990

-12L PETROL DCA : STARTSAT – 12,19,990

-1.5L DIESEL MT : STARTSAT – 10,99,990

-1.5L DIESEL ATM : STARTSAT – 12,99,990