अहमदनगर ब्रेकिंग : तरुणावर बिबट्याचा हल्ला ! परिसरात भीतीचे वातावरण

Published on -

Ahmadnagar Breaking : दुचाकीवर चाललेल्या दोन तरुणांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना राहुरी तालुक्यातील दवणगाव येथे घडली. यात एक तरूण जखमी झाला आहे.

याबाबत सूत्रांनी सांगितले, की दवणगाव येथील शेतकरी संदीप प्रभाकर शेडगे व अक्षय अर्जुन खपके हे दोघे जण कोल्हार येथून मोटारसायकलवर त्यांच्या घरी दवणगाव येथे येत होते.

दरम्यान भर दिवसा एका बिबट्याने अचानकपणे त्यांच्यावर हल्ला करत शेडगे यांचा पायाचा चावा घेतला; परंतू त्यांचे नशिब बलवत्तर होते, म्हणून त्यांचे प्राण वाचले. घटनेनंतर शेडगे यांना तातडीने नगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले

दवणगांव, आंबी परिसरात कायमच बिबट्याचा वावर असतो. त्यामुळे परिसरातील शेतकरी, शेतमजुर, महिला, शाळकरी विद्यार्थी धास्तावले असून या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वन खात्याने बिबट्या त्वरीत जेरबंद करावा, अशी मागणी सुनिल खपके, पोलिस पाटील नंदकिशोर खपके, दिलीप होन, भानुदास पांडागळे, राजेंद्र डुकरे, आबा जऱ्हाड यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe