Ahmednagar News : सात फरारी आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. राहुल बाळू सोनवणे (रा. दातरंगे मळा), रामा संतवीर ठाकूर (रा. भिंगार), निलेश भाऊसाहेब शिंदे (रा. कल्याण रोड), भाऊसाहेब सदाशिव सालके (रा. भिस्तबाग),
भूषण आनंदा चेमटे (रा. भाळवणी), भाऊसाहेब दगडू सालके (रा. शिवनेरी व्हाईटस्, जाधवनगर, अ.नगर) व बाबामिया हसन सय्यद (रा. बोधेगाव) असे अटक करण्यात आलेल्या सात आरोपींची नावे आहेत.
सदरील आरोपींविरुद्ध जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून, ते फरार होते. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ. राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोहेकॉ. संदीप पवार,
विश्वास बेरड, दत्तात्रय गव्हाणे, पोना. रविंद्र कर्डिले, विशाल दळवी, संदीप दरंदले, संतोष लोंढे, विजय ठोंबरे, फुरकान शेख, पोकॉ. मच्छिंद्र बर्डे व जालिंदर माने यांच्या पथकाने ही कारवाई केली. गणेशोत्सव व ईद ए मिलाद च्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपींना शोधून जेरबंद केले आहे.