Ahmednagar News : सार्वजनिक ठिकाणी आपआपसात मारामारी करून आरडाओरडा करण्यात आला, तसेच शांतता भंग करण्यात आली. ही घटना १३ सप्टेंबर २०२३ रोजी राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे घडली. या प्रकरणी राहुरी तालूक्यातील आठ जणांवर राहुरी पोलीस प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस नाईक दीपक रामदास फुंदे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दि. १३ सप्टेंबर २०२३ रोजी १२.१५ वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र लोखंडे, कर्मचारी सोमनाथ जायभाय व दिपक फुंदे हे कोल्हार खुर्द येथून राहुरी पोलीस ठाण्याकडे येत होते.
कोल्हार खुर्द शिवारातील हॉटेल न्यू प्रसादसमोर काही इसम आपआपसात जोरजोरात आरडाओरडा करुन वादविवाद करत होते. तेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांची मारामारी सोडवुन त्यांना आपआपसात वादविवाद करु नका. असे समजावुन सांगीतले. मात्र त्यांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमुन भांडण व आरडा ओरडा करुन परिसरातील शांतता भंग केली.
पोलिस नाईक दिपक रामदास फुंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी गणेश सुनिल लोंढे (वय २३ वर्षे, रा. कोल्हार खुर्द ता. राहुरी), प्रसाद बाळकृष्ण गिते (वय २१ वर्षे, रा. चिंचविहिरे, ता. राहुरी), यश संजय भोसले (वय २० वर्षे, रा. चिंचोली फाटा, ता. राहुरी),
सिध्दार्थ सारंग लोखंडे (वय २३ वर्षे, रा. कोल्हार बुद्रुक, ता. राहता ), अभिषेक सतिष लाटे (वय २१ वर्षे, रा. चिंचोली फाटा, ता. राहुरी), प्रशांत सुनिल लोखंडे (वय २२ वर्षे, रा. कोल्हार बुद्रुक, ता. राहता), आशु अनिल सांगळे (वय २२ वर्षे, रा. राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी),
राज रविंद्र पाटील (वय २२ वर्षे, रा. चिंचोली फाटा, ता. राहुरी). या आठ जणांवर राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १०५१ / २०२३ नुसार भादंवि कलम १६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.