करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना विलग करणे आवश्यक आहे. त्यानुसारच सरकार पावले उचलत आहे. कारण संपर्गाची साखळी तुटली तरच कोरोंना आटोक्यात येणार आहे.
मात्र, मुस्लिम लोकांना विलग करताना मुस्लिम उलेमांशी अर्थात धर्मगुरूंशी चर्चा करायला करावी, त्यांना विश्वासात घेतले जावे. त्यानंतरच विलगीकरणाची प्रक्रिया सुरू करावी,
अशी मागणीवजा सूचना करणारे एक पत्र जामिया अरबिया इस्लामिया, नागपूरचे सचिव मौलाना मोहम्मद अब्दुल अजिज खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना लिहिले आहे.
गेल्या काही दिवसांत शहरातील सतरंजीपुरा आणि मोमिनपुरा परिसरातील अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात विलगीकरण करण्यात आले आहे. याबाबत अजिज खान यांनी हे पत्र लिहिले आहे.
या पत्रात त्यांनी राज्य सरकारला काही मागणीवजा सूचना दिलेल्या आहेत. यात मुख्यत्वे संस्थात्मक विलगीकरणापेक्षा संशयितांना घरीच विलग करण्यात यावे, यावर भर दिला आहे. विलग करण्यापूर्वी काही मुस्लिम एनजीओ आणि धर्मगुरूंशी चर्चा करावी,
त्यांचीही मते विचारात घ्यावी आणि त्यांना विश्वासात घेऊनच प्रक्रिया पुढे न्यावी. याखेरीज ज्यांना विलग करण्यात आले आहे, त्यांची खाण्यापिण्याची योग्य ती सोय लावण्यात आलेली नाही.
सध्या रमजानचा महिना सुरू असून, मुस्लिमबांधवांचे रोजे सुरू आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याची सरकारने योग्य ती काळजी घ्यायला हवी असे त्यांनी म्हटले आहे. ‘