Fixed Deposit : फिक्स्ड डिपॉझिट (FD) हे नेहमीच गुंतवणुकीचे सर्वात पसंतीचे साधन मानले गेले आहे. कारण येथील गुंतवणूक ही इतर गुंतवणुकीपेक्षा सुरक्षित मानली जाते. गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास सर्वच बँकांनी त्यांच्या ग्राहकांसाठी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँका आपल्या एफडी व्यजदरात वाढ करताना दिसत आहेत.
अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना FD वर 7.75 टक्क्यांपर्यंत व्याज देऊ करत आहेत. अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांना 9 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. अशा परिस्थितीत, वेगवेगळ्या बँकांच्या एफडीच्या व्याजदरांबद्दल तपशील जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आज आम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), HDFC बँक आणि पंजाब नॅशनल बँकेचे एफडी दर सांगणार आहोत.

SBI FD व्याजदर
7-45 दिवसांमध्ये – सामान्य नागरिकांसाठी 3 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 टक्के.
46-179 या दिवशी – सामान्य नागरिकांसाठी 4.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 5.00 टक्के.
180-210 दिवसांमध्ये – सामान्य नागरिकांसाठी 5.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 5.75 टक्के.
211-1 वर्ष – सामान्य नागरिकांसाठी 5.75 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.25 टक्के.
1-2 वर्षानंतर – सामान्य नागरिकांसाठी 6.80 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.30 टक्के.
2-3 वर्षांनंतर – सामान्य नागरिकांसाठी 7.00 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के.
3-5 वर्षांनंतर – सामान्य नागरिकांसाठी 6.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.00 टक्के.
5-10 वर्षे – सामान्य नागरिकांसाठी 6.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.00 टक्के.
HDFC FD व्याजदर
7-14 दिवसांवर – सामान्य नागरिकांसाठी 3.00 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 टक्के.
6 महिने 1 दिवस – 9 महिने – सामान्य नागरिकांसाठी 5.75 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.25 टक्के.
9 महिने-1 वर्ष- सामान्य नागरिकांसाठी 6.00 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.50 टक्के.
1 वर्ष-15 महिने- सामान्य नागरिकांसाठी 6.60 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.10 टक्के.
21 महिने-2 वर्षे- सामान्य नागरिकांसाठी 7.00 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के.
2 वर्षे 11 महिने-35 महिने- सामान्य नागरिकांसाठी 7.00 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के.
5 वर्षे-10 वर्षे- सामान्य नागरिकांसाठी 7.00 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.75 टक्के.
PNB FD व्याजदर
7-14 दिवस- सामान्य नागरिकांसाठी 3.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.00 टक्के.
1 वर्षानंतर – सामान्य नागरिकांसाठी 6.80 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.30 टक्के.
1 वर्ष-443 दिवस- सामान्य नागरिकांसाठी 6.80 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.30 टक्के.
2 वर्षे-3 वर्षे- सामान्य नागरिकांसाठी 7.00 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के.
3 वर्षे-5 वर्षे- सामान्य नागरिकांसाठी 6.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 टक्के.
5 वर्षे-10 वर्षे- सामान्य नागरिकांसाठी 6.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.30 टक्के.