FD Rates : ज्या गुंतवणूकदारांना जोखीम घ्यायची नाही ते मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. कारण येथील गुंतवणूक ही इतर गुंतवणुकीपेक्षा सुरक्षित मानली जाते. पण येथील परतावा हा इतर गुंतवणुकीपेक्षा मर्यादित असतो, पण अशा काही बँका आहेत, ज्या मुदत ठेवींवर चांगला परतावा ऑफर करतात.
देशातील अनेक लघु वित्त आणि खाजगी क्षेत्रातील बँका FD वर ८.६ टक्के व्याज देत आहेत. देशातील मोठ्या सरकारी बँकांच्या तुलनेत हे व्याज जास्त आहे. या बँका तीन वर्षांच्या FD वर 7.6 टक्के व्याजदर ऑफर करत आहेत. 3 वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी पुढीलप्रमाणे…
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक तीन वर्षांच्या एफडीवर ८.६ टक्के व्याज ऑफर करते. स्मॉल फायनान्स बँकांमधील 3 वर्षांच्या एफडीवरील हा सर्वोत्तम दर आहे. येथे 1 लाख रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांत 1.29 लाख रुपयांपर्यंत वाढते.
एयू स्मॉल फायनान्स बँक
स्मॉल फायनान्स बँक आणि इक्विटास स्मॉल फायनान्स बँक तीन वर्षांच्या FD वर 8 टक्के व्याज ऑफर करत आहे. येथे 1 लाख रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांत 1.27 लाख रुपये होईल.DEUTSCHE Bank
ड्यूश बँक
विदेशी बँकांमध्ये, ड्यूश बँक तीन वर्षांच्या एफडीवर 7.75 टक्के व्याज देत आहे. या बँकांच्या एफडीमध्ये गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.26 लाख रुपये होईल.
डीसीबी बँक
DCB बँक तीन वर्षांच्या FD वर 7.60 टक्के व्याज देते. हे खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये सर्वाधिक व्याज देत आहे. येथे 1 लाख रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांत 1.25 लाख रुपये होईल.
बंधन बँक
बंधन बँक, IDFC फर्स्ट बँक, इंडसइंड बँक आणि येस बँक तीन वर्षांच्या एफडीवर 7.25 टक्के व्याज देतात. 1 लाख रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांत 1.24 लाख रुपये होईल.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक तीन वर्षांच्या एफडीवर ७.२० टक्के व्याज देते. 1 लाख रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांत वाढून 1.24 लाख रुपये होते.