Ahmednagar News : नगर तालुक्यातील देहरे येथील सराईत गुन्हेगार गोरख गजाबापु कारंडे यास नगर जिल्हयातुन दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहे, तर गणपती उत्सवाचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखणेकरीता ८५ जणांना नगर शहर व नगर तालुका हददीतून २६ सप्टेंबरच्या पहाटे पासून २८ सप्टेबरच्या मध्यरात्री पर्यंत तडीपार करण्यात येणार आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे.
एमआयडीसी पोलिस स्टेशन हददीत सराईत गोरख गजाबापु कारंडे (रा. देहरे ता. नगर) याच्यावर गैरकायद्याची मंडळी जमवून लाथाबुक्याने मारहाण करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, लाकडी दांडकाने कोयत्याने मारहाण करणे,
फिर्यादीचे ताब्यातील ताब्यातील रक्कम ऐवज जबरीने चोरून नेणे, बलात्कार करणे, विनयभंग करणे, जबरी चोरी करणे. रस्त्यात अडवून मारणे, दंगा करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल आहेत.
त्यामुळे आरोपी गोरख कारंडे यास जिल्हयातून दोन वर्षांकरीता तडीपार करण्याबाबत प्रस्ताव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे स.पो.नि. राजेंद्र सानप यांनी प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे पाठविला होता. सदर प्रस्तावाला प्रांताधिकारी पाटील यांनी मान्यता दिल्याने आरोपी कारंडे वर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखणेकरीता समाजकंटकाकडुन एखादे कृत्य घडवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये याकरीता त्यांना सीआरपीसी कलम १४४ (२) प्रमाणे नगर शहर व तालुका हददीतुन २६ सप्टेंबरच्या पहाटे पासून २८ सप्टेंबरच्या मध्यरात्री पर्यंत हद्दपार केले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक संपत भोसले, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पो. कॉ. किशोर जाधव, सचिन हरदास, उमेश शेरकर, सुरज देशमुख, महिला पो. ना. मनिषा काळे यांचे पथकाने केली आहे.