Ahmednagar Crime : पाथर्डी तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर रात्री एक वाजता अत्याचार करण्यात आला. रविवारी रात्री एक वाजता ही घटना घडली. मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मुलगी व तिचे आई-वडील घरात झोपलेले होते. मुलीला दिपक श्रीकांत कराड याने घराबाहेर बोलावून घेतले वतिला घराशेजारील कपाशीच्या शेतात नेऊन तेथे तिच्यावर अत्याचार केला.
मुलगी अल्पवयीन असून, ती अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. मुलीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दीपक कराड याच्याविरुद्ध अपहरण करणे, बलात्कार करणे, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून सरंक्षण कायद्यानुसार व झालेल्या प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
दीपक कराड हा फरार झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे यांनी घटनास्थळाला भेट देत पंचनामा केला आहे. कायंदे तपास करीत आहेत. दिपक कराडला तातडीने अटक करण्याची मागणी अत्याचारित मुलीच्या नातेवाईकांनी पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.