राहुरी शहरातून पिकअपची चोरी ! परिसरात खळबळ

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar news : राहुरी शहरातील घरासमोर लावलेली पिकअप गाडी दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात तिन भामट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली. सदर घटना ही सीसीटीव्ही कॅर्मेयात कैद झाली असुन या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मन्सुर खान मोहम्मद खान पठाण, वय ३५ वर्षे, हे राहुरी शहरातील मुलनमाथा परिसरात राहतात. दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री पठाण हे त्यांच्या घरात झोपलेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची महिंद्रा कंपनीची मिनी पिकअप गाडी नं. एम. एच. १२ ई एफ १८८४ ही घरासमोर लावली होती.

तेव्हा मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास अज्ञात तिन भामट्यांनी पठाण यांची पिकअप गाडी डांबरी रोड पर्यंत ढकलत नेली. त्यानंतर डुप्लिकेट चावी लाऊन गाडी चोरुन नेली. पठाण हे सकाळी उठल्यानंतर गाडी चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यांनी सीसीटिव्ही फूटेज तपासले असता चोरीची सर्व घटना कॅमेऱ्यात दिसून आली. पठाण यांनी परिसरात गाडीचा शोध घेतला. मात्र गाडी मिळून आली नाही. त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पठाण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरा विरोधात गुन्हा रजि. नं. १०६७ / २०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe