Grains Secure Tips: करा हे साधे सोपे उपाय आणि किडी व अळ्यांना ठेवा धान्य डाळीपासून दूर! वाचा माहिती

Ajay Patil
Published:
grain secure tips

Grains Secure Tips:- बऱ्याचदा शेतकरी कुटुंबांमध्ये किंवा इतर कुटुंबामध्ये देखील वर्षभर पुरेल एवढे गहू, ज्वारी, बाजरी आणि तांदूळ यासारख्या अन्नधान्याचा आणि तूर, उडीद आणि मुगाची डाळ इत्यादी डाळिचा देखील साठा करून ठेवला जातो. परंतु साठा करून ठेवलेल्या या अन्नधान्यांमध्ये बऱ्याचदा विविध प्रकारची किडी किंवा अळींचा प्रादुर्भाव होतो.

अशा किडी व अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे धान्य विशेषता गहू हा पोखरला जातो व त्याचे खूप नुकसान होते. धान्यामध्ये किडी व अळ्यांचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करतो. परंतु अशा उपायोजनांचा फारसा सकारात्मक परिणाम होताना दिसून येत नाही. त्यामुळे आपण या लेखांमध्ये धान्य आणि डाळींना कीड आणि अळ्या लागू नये यासाठी काही साधे आणि सोपे उपाय पाहणार आहोत ज्यांच्या माध्यमातून धान्य बऱ्याच दिवस चांगल्या पद्धतीने टिकून राहिल.

 डाळी धान्यांमध्ये किड अळ्यांचा प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठीचे उपाय

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही अन्नधान्य किंवा डाळी ज्या डब्यामध्ये भरून ठेवतात तो डबा स्वच्छ आणि कोरडा असणे गरजेचे आहे. असा डब्बा किंवा कणगी ओलसर असता कामा नये. जर अशी साधने ओलसर राहिली तर धान्य व डाळी खराब होण्याची शक्यता असते. तसेच अशा ओलसर ठिकाणी कीटक लवकर शिरतात.

त्यामुळे स्वच्छतेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. तसेच पिठाच्या बाबतीत देखील महत्त्वाचे म्हणजे  पिठामध्ये जर तुम्ही सुकलेली लाल मिरची घालून ठेवली तर पीठ खराब होत नाही. एवढेच नाही तर गव्हासारख्या महत्त्वाच्या धान्यामध्ये पोर किड्यांचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता तुम्ही एका कापसामध्ये जाड मीठ एका कापडात बांधून गावामध्ये ठेवले तर गहू महिनोमहिने चांगला राहतो.

1- धान्यातील अळ्या व किडे निघून जाव्या त्याकरता तुम्ही डाळीच्या डब्यामध्ये कच्चे सोललेले लसूण घातले तर फायदा मिळतो किंवा तुम्ही लाल मिरच्या देखील टाकू शकतात. यामुळे अन्न धान्याला कीड लागत नाही.

2- तसेच डाळिंमध्ये किडींचा प्रादुर्भाव होऊ नये याकरता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्या डब्यात तुम्ही डाळी ठेवलेल्या असतात त्या डब्यात कडुलिंबाची काही पाने ठेवणे गरजेचे असते. कडुलिंबाची किंवा पुदिनाची पाने जर तुम्ही डब्यात ठेवली तर मॉइश्चर अर्थात ओलसरपणा राहत नाही व डाळी बरेच दिवस चांगल्या स्थितीत राहतात. तसेच अजून एक महत्त्वाचा उपाय म्हणजे जर तुम्ही डाळिंना राईच तेल लावून आणि डाळी उन्हात सुकवून डब्ब्यात भरली तर डाळी खराब होत नाहीत.

3- तसेच तुम्हाला रवा डब्यात भरून ठेवायचा असेल आणि त्याला कीड किंवा अळ्या लागू नये त्याकरिता तुम्ही कढईमध्ये रवा भाजून घ्यावा व थंड झाल्यानंतर डब्यात भरून ठेवावा. तसेच तुम्ही त्यामध्ये लवंग ठेवले तरी फायदा मिळतो.

4- तसेच तुमच्या घरात मध असेल व तुम्हाला ते बरेच दिवस टिकवायचे असेल किंवा त्याला मुंग्या लागू नये अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही मधाच्या बरणीत आठ ते दहा काळी मिरी मधात घालू शकता यामुळे मध बरेच दिवस उत्तम पद्धतीने टिकते.

5- तसेच तांदूळ तुम्हाला बरेच दिवस चांगल्या स्थितीत ठेवायचे असतील तर त्यामध्ये पुदिन्याची वाळलेली पाने घालणे फायद्याचे ठरते. याशिवाय तुम्ही कडुलिंबाची पाने देखील तांदुळाच्या डब्यात ठेवू शकता व यामुळे देखील तांदूळ चांगल्या स्थितीत राहतात.

अशा पद्धतीने अगदी साधे सोपे उपाय करून तुम्ही तुमच्या घरातील अन्नधान्य आणि डाळी चांगल्या स्थितीमध्ये ठेवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe