Ahmednagar Crime : अवैध व्यावसायिकांविरुद्ध एलसीबीच्या पथकाची कारवाई

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : अवैध व्यावसायिकांविरुद्ध एलसीबीच्या पथकाने जिल्ह्यात १५ जणांविरुद्ध कारवाई केली आहे. आरोपींकडून ६ लाख ७५ हजार ७६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे श्रीरामपूर तालुका आणि शहरातील १२ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

प्रकाश पार्थनाथ रॉय (वय २३, रा. नथुराम ग्राम, जि. नदिया, कलकत्ता), नंदाबाई दादा काळे (रा. सुरेगाव, कोपरगाव), राहुल माणिक जाधव (रा. नांदूर, ता. राहाता), दिनकर रामनाथ काथे (रा. सरस्वती कॉलनी, श्रीरामपूर) , विष्णू पांडुरंग जाधव (रा. श्रीरामपूर) मिना शाम पवार (रा. भैरवनाथ नगर, श्रीरामपूर),

साधना मोहन काळे (रा. सूतगिरणी, श्रीरामपूर), वंदना संतोष काळे (रा. श्रीरामपूर), सुनिल गण्णा गवळी (रा. गोपाळवाडा), शिवाजी प्रकाश परदेशी (रा. सूतगिरणी), उषा प्रभाकर काळे (रा. सूतगिरणी), नाज फकिरमोहंमद शेख (रा. ममदापूर), कमल गव्हाणे (रा. गोपाळवाडा),

अनिल मच्छिंद्र पवार (रा. खटकळी, बेलापूर) व संजय जनार्दन नरवडे असे कारवाई करण्यात आलेल्या इसमांची नावे आहेत. अवैध विदेशी दारु व गावठी हातभट्टी प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. कोतवाली, कोपरगाव, श्रीरामपूर शहर व तालुका पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe