iPhone 14 : अप्रतिम ऑफर! iPhone 14 सह ‘या’ शक्तिशाली फोनवर होईल हजारोंचा फायदा, जाणून घ्या डिटेल्स

Published on -

iPhone 14 : नुकतीच Apple ने आपली iPhone 15 सीरिज लाँच केली आहे. ही सीरिज लाँच होताच कंपनीच्या काही फोनवर उत्तम ऑफर मिळत आहे. ज्याचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची सहज बचत होईल.

तुम्ही आता iPhone 14 मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. विशेष म्हणजे तुम्ही iPhone 14 सह काही शक्तिशाली फोनवर देखील सवलत मिळू शकता. तुमच्यासाठी शानदार ऑफर फ्लिपकार्टने आणली आहे. लवकरात लवकर तिचा लाभ घ्या.

iPhone 14

हे लक्षात घ्या की Apple चा iPhone 14 अगोदरच प्लॅटफॉर्मवर मोठ्या सवलतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. किमतीचा विचार केला तर फ्लिपकार्टवर 35,501 रुपयांच्या सवलतीनंतर खरेदीदार फक्त 34,399 रुपयांमध्ये iPhone 14 खरेदी करू शकतील. मागील वेळी कंपनीने iPhone 13 लाँच केल्यानंतर iPhone 14 हा आपली छाप पाडण्यात मागे पडला होता, मात्र आता शानदार सवलतीनंतर त्याची विक्री वाढू शकते.

Oppo Reno10 Pro 5G

नुकताच Oppo ने आपला Oppo Reno10 Pro 5G फोन 44,999 रुपयांच्या किंमतीला लॉन्च केला असून जो आता या सेल दरम्यान 35,999 रुपयांमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल. सेल्फी प्रेमींसाठी हा स्मार्टफोन एक सर्वोत्तम पर्याय आहे कारण या फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा असून मागे 50MP 32MP 8MP ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

नथिंग फोन (1)

या अप्रतिम सेल दरम्यान, नथिंग फोन (1) ची किंमत 23,000 रुपयांपर्यंत खाली येते. या सवलतीमध्ये बँक ऑफरचा समावेश असून कंपनी या स्मार्टफोनवर फ्लॅट डिस्काउंट देखील उपलब्ध करून देत आहे हे स्पष्ट नाही. ज्यावेळी विक्री थेट होईल त्यावेळी याची पुष्टी करता येईल.

Google Pixel 7

तसेच या सेल दरम्यान, Google च्या प्रीमियम फोनवर चांगली सवलत मिळत आहे, तुम्हाला तो 59,999 रुपयांऐवजी 36,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या स्मार्टफोनला उर्जा देण्यासाठी, यात कंपनीचा इन-हाउस Google Tensor G2 चिपसेट कंपनीकडून देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!