पवारांचीच ब्रॅण्डिंग खेळी? अजित दादा सुप्रिया सुळेंऐवजी रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री…

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बदलेले आहे. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर सहृद पवार गटाची धुरा आ. रोहित पवार मोठया कौशल्याने हाताळताना दिसतायेत. हे करताना त्यांना सध्या विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.

सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. तर दुसरीकडे त्यांचे समर्थक त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून जाहीरपणे संबोधत आहेत. पुणे जिल्ह्यातील टोलनाक्यापाठोपाठ रोहित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या जामखेडमध्येही हेच पोस्टर लावण्यात आले आहे.

पवार हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील, असे त्यांच्या पक्षातील काही कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. याबाबत पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. राष्ट्रवादी फुटीनंतर ज्येष्ठ नेत्यांनी देखील पक्षाची साथ सोडली. त्यानंतर आमदार रोहित पवार राज्यभर दौरे करत आहेत.

राज्य आणि देशातील विविध मुद्दे आणि राजकारणावरही ते बोलत आहेत. त्यांची एक वेगळी प्रतिमा राज्यात तयार झाली आहे. त्यांनी पक्षाची साथ सोडलेल्यांवर टीकाही केली आहे. त्यामुळे त्यांना विरोधक घेण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु आता त्यांचे समर्थकही आक्रमक झाले आहेत.

आजवर अजित पवार व सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते. परंतु आता रोहित पवार या यादीत आले आहेत. भावी मुख्यमंत्री म्हणून त्याचे फलक झळकत आहेत. रोहित पवार यांचा आज (२९ सप्टेंबर) वाढदिवस आहे.

त्यामुळे त्यांचा मतदार संघ जामखेड मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला आहे. जामखेड शहरातील बीड मार्गावर हे फलक लागलेलं आहेत.

रोहित पवारांच्या फलकाबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया

रोहित पवार यांना भावी मुख्यमंत्री म्हणवणाऱ्या पोस्टरवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. कोण किती फलक लावणार याबद्दल मी बोलणार नाही, आता सर्वजण मुख्यमंत्र्यांचा बॅनर लावतील,  पण जोपर्यंत १४५ चा जादुई आकडा गाठला जात नाही, तोपर्यंत त्याला काहीच अर्थ नाही, असं अजित पवार म्हणाले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe