काही व्यवसाय तुम्हाला अगदी कमीत कमी गुंतवणुकीमध्ये लाखात नफा कमवून देतात आणि अशा व्यवसायांची मागणी देखील भरपूर प्रमाणात असते. अनेक बिझनेस आयडिया नाविन्यपूर्ण रीतीने केल्यास देखील कमी गुंतवणुकीत खूप मोठा नफा मिळतो. फक्त आपल्याला व्यवसाय सुरू करण्या अगोदर व्यवसायांची निवड आणि त्यांना असलेली बाजारपेठेतील मागणी या दोन गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते.
जर आपण व्यवसायांचे महत्त्व पाहिले तर आज-काल शिक्षणाच्या मानाने नोकऱ्यांचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे नोकरीपेक्षा एखादा व्यवसाय करत आर्थिक घडी लवकरात लवकर बसवण्यास महत्त्व आहे. त्यामुळे एखादा छोटा मोठा व्यवसाय करून यशस्वी होणे खूप गरजेचे आहे.
त्यातल्या त्यात कमीत कमी गुंतवणूक करून सुरू करता येऊ शकणारे व्यवसाय जर केले तर फायद्याचे देखील ठरते. याच अनुषंगाने या लेखांमध्ये आपण असा व्यवसाय पाहणार आहोत की तो तुम्हाला कमीत कमी पैशांची गुंतवणूक करून महिन्याला लाख रुपये कमवून देऊ शकतो.
काय आहे हा नवीन उद्योग?
आता पेट्रोल आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे आणि पेट्रोल हे पेट्रोल पंपावरच मिळते हे देखील आपल्याला माहिती आहे. पेट्रोल पंप उभारणे म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागते हे तेवढे सत्य आहे. तसेच तुम्हाला पेट्रोल पंप सुरू करायचा असेल तर अगोदरच मोठ्या प्रमाणावर पेट्रोलियम कंपन्यांकडे असंख्य प्रमाणात अर्ज येऊन पडलेले असतात.
यामध्ये आपल्याला पेट्रोल पंप मिळेलच याची शक्यता नसते.परंतु रिपोर्स एनर्जी या पुण्यातील एका स्टार्टअप कंपनीने तुम्हाला पेट्रोल पंपाचे मालक होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासंबंधी माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
हा असणार चालता फिरता पेट्रोल पंप
रिपोर्ट एनर्जी या पुणे येथील स्टार्टअप कंपनीने एक उत्तम बिझनेस आयडिया आणली असून त्या माध्यमातून चालता फिरता पेट्रोल पंप देण्यात येणार आहे व या पंपाच्या माध्यमातून तुम्ही डिझेलची विक्री करू शकणार आहात. नवी दिल्लीमध्ये पार पडलेल्या ऑटो एक्सपो 2023 मध्ये हा चालता फिरता पेट्रोल पंप सादर करण्यात आला होता व हा डिझेल पंप एका ट्रकवर बसवला असतो व तीन हजार, 4000 आणि 6000 लिटर क्षमतेमध्ये उपलब्ध आहे.
महिंद्रा किंवा टाटा तसेच आयशरच्या ट्रकवर हा पंप तुम्हाला बसवता येऊ शकतो. या पेट्रोल पंपाकरिता 17 लाख रुपये इतकी किंमत लागणार असून लागणारी ट्रक आणि पेट्रोल पंप ची क्षमता किती आहे यानुसार पात्रता लागणाऱ्या किमतीमध्ये बदल होऊ शकतो.
हा पेट्रोल पंप घेण्यासाठी तुम्हाला एक फर्म सुरु करावा लागणार असून त्याचा करार रिपोस एनर्जी सोबत करावा लागणार आहे. नंतर त्या पुढची प्रक्रिया रिपोस एनर्जी करेल व याकरिता 90 ते 120 दिवस एवढा कालावधी लागेल. यासाठी तुमच्याकडे एक कार्यालय आणि ट्रक उभ्या करण्यासाठी जागा राहिली तरी पुरेसे आहे.
कोणत्या ठिकाणी करू शकता तुम्ही डिझेलचा पुरवठा?
या चालत्या फिरत्या डिझेल पंपाच्या माध्यमातून तुम्हाला रस्त्यावर विक्री करता येणार नाही फक्त व्यावसायिक ठिकाणी विक्री करता येणार आहे. या माध्यमातून तुम्ही शाळा, कॉलेज तसेच सोसायटी, कारखाने व हॉस्पिटल तसेच बांधकाम व्यवसाय आणि जनरेटर असणाऱ्या ठिकाणी डिझेलची विक्री करू शकता. यामध्ये तीन हजार लिटर पंप मधून तुम्ही दिवसाला दोन हजार लिटर डिझेल विकले तरी चार हजार रुपये तुम्हाला कमिशन मिळते. म्हणजेच तीस दिवसाचा खर्च पकडला तर तुम्ही 1.2 लाख रुपये कमाई या माध्यमातून करू शकता व खर्च वजा केल्यावर एक लाख रुपये महिना तुम्हाला आरामात मिळू शकतो.