Best Bank In India : ‘या’ आहेत सर्वात सुरक्षित बँक ! RBI ने जारी केली नवी यादी, तुमचे पैसे कधीही बुडणार नाहीत

Published on -

तुमचे पैसे कुठे सुरक्षित आहेत असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुमचे उत्तर काय असेल ? साहजिकच तुमचे उत्तर बँक असे असेल. परंतु तुम्हाला माहित आहे का की आरबीआयच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जर एखादी बँक दिवाळखोरीत गेली तर तुम्हाला फक्त पाच लाख रुपयांपर्यंतच पैसे मिळू शकतात मग भलेही तुम्ही बँकेत 5 लाखरुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली असेल तरीही.

आता सर्वात मोठा प्रश्न असा निर्माण होतो की, बँकेत पैसे ठेवण्यासाठी पुरेशी सुरक्षा नसेल तर पैसे ठेवायचे कुठे, कारण आपण घरात जास्त रोकड ठेवू शकत नाही. मग कसलीही चिंता न करता आपण कोणत्या बँकेत पैसे ठेऊ शकतो. कारण बऱ्याचदा आपण आरबीआयने अनेक बँकांचे परवाने रद्द केल्याचे ऐकले असेल.

आता अशा स्थितीत केवळ बँकांचे पैसेच बुडत नाहीत, तर ज्यांचे पैसे त्या बँकेत ठेवण्यात आले होते, त्यांचे ही पैसे बुडतात. चला तर मग जाणून घेऊया अशा बँकांबद्दल जिथे तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवू शकता.

आरबीआय ही सर्व बँकांची नियामक संस्था आहे, हे तुम्हाला माहित असेलच. यात सर्व बँकांची माहिती असते. बँकेत काही अनियमितता आढळल्यास त्या बँकेचा परवाना रद्द केला जातो.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) गेल्या वर्षभरात अनेक बँकांचे परवाने रद्द केले आहेत. आता आरबीआयनेच एक यादी जारी केली आहे ज्यामध्ये भारतातील कोणत्या बँका पूर्णपणे सुरक्षित आहेत याची माहिती दिली आहे. इतर बँक वाईट आहे असे नाही पण आरबीआयने सुरक्षित बँकांविषयी माहिती दिली आहे.

रिझर्व्ह बँकेने ‘या’ बँकांना सुरक्षित घोषित केले :-  एचडीएफसी बँक ही खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. एसबीआय ही सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक आहे. आयसीआयसीआय बँक ही तिसरी सर्वात मोठी खाजगी बँक आहे. आरबीआयने या तिन्ही बँकांना सर्वात सुरक्षित बँकांमध्ये ठेवले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News