Moto G8 Power Smartphone : सॅमसंगला टक्कर द्यायला आला मोटोरोलाचा जबरदस्त स्मार्टफोन, कमी किमतीत सर्वोत्तम फीचर्स

Ahmednagarlive24 office
Published:

आजकाल लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाची स्मार्टफोन ही गरज बनली आहे. याशिवाय आजकाल काहीही शक्य होत नाही. अशा परिस्थितीत स्मार्टफोन उत्पादक कंपन्याही बाजारात एकमेकांशी स्पर्धा करत आहेत.

सॅमसंग, नोकिया किंवा शाओमीसारख्या कंपन्या दररोज जबरदस्त फीचर्स असलेले स्मार्टफोन लाँच करत आहेत. आता यात मोटोरोला देखील मागे राहिली नाही. मोटोरोलाने नुकताच आपला Moto G8 Power लाँच केला आहे

हा फोन जबरदस्त अशा फीचर्सनी परिपूर्ण आहे. कॅमेरा, बॅटरीची क्वालिटी देखील अतिशय उत्तम आहे. Moto G8 मध्ये 6.40 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर Motorola Moto G8 Power मध्ये 4GB रॅम स्टोरेज आहे. हा फोन Android 10 द्वारे ऑपरेट केला जातो. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

अनेकांना स्मार्टफोन हा क्वालिटी कॅमेऱ्यासाठी हवा असतो. त्यासाठी हा फोन उत्तम पर्याय आहे. संर्टफोनच्या मागील बाजूस 16-मेगापिक्सेल (f/1.7, 1.12-मायक्रॉन) प्रायमरी कॅमेरा आहे. 2-मेगापिक्सेल (f/2.2, 1.75-मायक्रॉन) कॅमेरा, एक 8-मेगापिक्सेल (f/2.2, 1.12-मायक्रॉन) कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेल (f/2.2, 1.12-मायक्रॉन) कॅमेरा आहे. सेल्फीसाठी, f/2.0 अपर्चर आणि 1-मायक्रॉन पिक्सेल आकारासह 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे.

मोटोरोला मोटो जी 8 मध्ये 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डद्वारे 512 जीबीपर्यंत वाढवता येते. हा ड्युअल सिम मोबाइल आहे, जो नॅनो-सिमकार्ड स्वीकारतो. मोटोरोला मोटो जी 8 पॉवर ची लांबी 55.95 x 75.84 x 9.63 मिमी (उंची x रुंदी x जाडी) आहे आणि वजन फक्त 197.00 ग्रॅम आहे. हा फोन स्मोक ब्लॅक आणि कॅप्री ब्लू रंगात लाँच करण्यात आले होते.

यामध्ये Wi-Fi 802.11 b/g/n, GPS, ब्लूटूथ v5.00, Wi-Fi Direct, 3G, आणि दोन्ही सिम कार्डवर 4G फीचर्स आहेत. फोनच्या सेन्सरमध्ये एक्सेलेरोमीटर, एम्बियंट लाइट सेन्सर, जायरोस्कोप, प्रॉक्सिमिटी सेन्सर आणि फिंगरप्रिंट सेन्सर चा समावेश आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe