Vastu Tips : आपल्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी ते प्रयत्नही करतात. परंतु तुमच्या एका चुकीमुळे तुमच्यावर देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते. कष्टाने कमावलेला पैसा एका झटक्यात वाया जातो. त्यामुळे दैनंदिन जीवनात काही चुका करू नका.
जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर तुम्हाला दररोज सकाळी उठल्यावर काही महत्त्वाचे काम करावे लागणार आहे. तुमच्यावर लक्ष्मी देवी कृपा करेल. तुमच्यावर अधिक धनवर्षाव होऊ शकतो. कसे ते जाणून घ्या सविस्तर माहिती.
करा तुळशीची पूजा
धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीला तुळस खूप आवडते. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये तुळशीची पूजा केली तर तुम्हाला लक्ष्मीची कृपा होते, त्यामुळे रोज तुळशीची पूजा करावी, असे म्हटले जाते.
लावा मुख्य प्रवेशद्वारावर दिवा
जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर लक्ष्मी देवीच्या प्रवेशासाठी सकाळी आणि संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावणे गरजेचे आहे. या उपायाने तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते शिवाय घरातील कर्जाची समस्या दूर होते. तसेच तुमच्या पैशाशी संबंधित समस्याही संपतात.
अर्पण करा सूर्यदेवाला जल
ज्योतिष शास्त्रानुसार जे लोक रोज सूर्यदेवाला जल अर्पण करतात त्यांच्या जीवनात खूप सुख-समृद्धी येते. जर तुम्हालाही सुख-समृद्धी पाहिजे असेल तर सूर्यदेवाला जल अर्पण करावे.
करा मुख्य प्रवेशद्वाराची स्वच्छता
ज्योतिषशास्त्रानुसार घरातील स्वच्छता आणि वास्तुशास्त्राच्या माध्यमातून लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याची परंपरा असून हे लक्षात ठेवा की तुमच्या घरातील घाण आणि गोंधळामुळे देवी लक्ष्मीच्या आगमनात अडथळा येतो. जर तुम्ही रांगोळी आणि तोरण बसवण्यासोबत घराच्या मुख्य प्रवेशद्वाराची सफाई केली तर तुम्हाला देवी लक्ष्मीचा अपार आशीर्वाद मिळतो आणि तुम्हाला आयुष्यात कधीच पैशाची कमतरता जाणवत नाही, असे सांगण्यात येते.