Business Ideas : आजच्या काळात अनेक लोक स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी धडपडत असतात. व्यवसायाच्या माध्यमातून पैसे कमवणे, आपले स्थान निर्माण करणे आदी गोष्टी करायच्या असतात. लोकांना व्यवसायाच्या माध्यमातून अधिक पैसे कमवायचे असतात.
पण व्यवसायसंदर्भात त्यांना काही कल्पना नसते. त्यामुळे अनेकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करता येत नाही. आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत ज्यातून तुम्ही दरमहा दीड लाख रुपये कमवू शकता.
* व्यवसाय सुरू करण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या –
*बाजार समजून घ्या : आपले टार्गेट मार्केट कोण आहे आणि त्यांच्या गरजा काय आहेत हे समजून घेणे महत्वाचे आहे.
*ग्राहकांची मागणी: बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करणारी उत्पादने किंवा सेवा प्रदान करीत आहोत याची खात्री केली पाहिजे.
*विक्री आणि मार्केटिंग : आपली उत्पादने किंवा सेवा यांची प्रभावी विक्री आणि मार्केटिंग योजना तयार करणे महत्वाचे आहे.
*आर्थिक भांडवल : व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी पुरेसे आर्थिक भांडवल असणे गरजेचे आहे.
*उत्पादन किंवा सेवेची गुणवत्ता: उत्पादने किंवा सेवा उच्च गुणवत्तेची आणि ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी असली पाहिजेत.
*चप्पल निर्मिती व्यवसायातून महिन्याला दीड लाख कमवा
दरमहा दीड लाख रुपये कमावण्यासाठी जास्त मागणी असलेला आणि फायदेशीर व्यवसाय चप्पल निर्मितीचा व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरेल. याच्यासाठी लागणार खर्च किंवा इतर गोष्टी यांना तुलनेने जास्त खर्च येत नाही.
*चप्पल निर्मितीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी या गोष्टी लागतील
– पूर्णपणे स्वयंचलित स्लीपर मेकिंग मशीन : हे मशीन स्लीपर उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया स्वयंचलित करते. याची किंमत १ लाख रुपये आहे.
– कच्चा माल : स्थानिक बाजारात सहज उपलब्ध होणारे चामडे, रबर आणि इतर साहित्य लागेल.
– कामगार : चप्पल बनवण्यासाठी कामगारांची गरज भासणार असून, त्यांची संख्या तुमच्या उत्पादन क्षमतेवर अवलंबून असेल.
– नियोजन आणि ब्रँडिंग : मोठी बिझनेस आयडिया, प्रभावी ब्रँडिंग धोरण असणे महत्वाचे आहे. आपली चप्पल उच्च प्रतीची आणि ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी आहे याची खात्री करा.
वरील सर्व गोष्टींचे पालन करून आपण चप्पल निर्मितीचा व्यवसाय सुरू करू शकता. यातून दरमहा 1.5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त कमाई होण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल कारण कोणत्याही व्यवसायातून पैसे कमावायला वेळ लागतो. पण प्रयत्नातून तुम्ही व्यवसाय मोठा करू शकता.