PNB FD : घरबसल्या लाखोंची कमाई करायचीय? आजच करा ‘या’ विशेष FD मध्ये बचत

Ahmednagarlive24 office
Published:
PNB FD

PNB FD : सध्या अनेक बचत योजना आहेत. तुम्ही सरकारी किंवा खासगी बचत योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. परंतु, अनेकजण जास्त परतावा देणाऱ्या आणि कोणतीही जोखीम न घ्यावी लागणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणत्याही बचत योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता.

तसेच अनेक बँक FD योजना आहेत, ज्यात तुम्ही गुंतवणूक करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनांमध्ये निश्चित परतावा आणि कोणतीही जोखीम तुम्हाला घ्यावी लागत नाही. अनेकजण PNB च्या विशेष FD योजनेमध्ये गुंतवणूक करत आहेत. यात सर्वात जास्त व्याज गुंतवणूकदारांना मिळत आहे.

PNB ची विशेष एफडी स्कीम

PNB या बँकेच्या 5 वर्षांच्या FD वर सामान्य ग्राहकांना वार्षिक 6.5 टक्के दराने व्याज मिळत आहे. समजा एखाद्या ग्राहकाने 10 लाख रुपयांची एफडी केल्यास त्याला मॅच्युरिटीवर 13 लाख 80 हजार 420 रुपयांचा शानदार परतावा मिळतो. एकंदरीतच त्याला एकूण व्याजातून 3 लाख 80 हजार 420 रुपयांचा नफा होईल.

इतकेच नाही तर ज्येष्ठ नागरिकांना एकूण ५ वर्षांच्या एफडीवर ७ टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. समजा बँकेच्या एखाद्या ग्राहकाने 10 लाख रुपयांची एफडी केली तर त्याला मॅच्युरिटीवर तब्बल 14,14,778 रुपयांचा निधी मिळेल. या निधीतून रु. 4,14,778 व्याज उत्पन्न मिळते, हे लक्षात ठेवा.

तसेच PNB आपल्या 666 दिवसांच्या FD योजनेवर आपल्या सामान्य ग्राहकांना एकूण 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के दराने व्याज देत असून हा व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी आहे.

किती भरावा लागणार कर?

तर त्याच वेळी, आयकर कलम 80C अंतर्गत 5 वर्षांच्या एफडीवर कराचा दावा करता येतो. तसेच एफडीमध्ये मिळणारे व्याज करपात्र असून यात एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर वाचवता येतो. इतकेच नाही तर यात 5 वर्षांचा लॉक-इन कालावधीही आहे. हे लक्षात ठेवा की हा कार्यकाळ 10 वर्षांसाठीही वाढवला जाऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe