Jio Recharge Plan : जर तुम्ही देशातील सर्वात लोकप्रिय कंपनी रिलायन्स जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत वेगवेगळे रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. यात प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनचा समावेश असतो. कंपनीने सध्या असाच एक शानदार प्लॅन आणला आहे. ज्यात तुम्हाला महिनाभर मोफत इंटरनेट मिळेल.
जर तुम्ही Jio Fiber चा कोणताही पोस्टपेड प्लॅन निवडला तर तुम्हाला कोणतेही इन्स्टॉलेशन शुल्क भरावे लागणार नाही, हे लक्षात घ्या. शिवाय कंपनी मोफत वायफाय स्थापित करू शकते. यासाठी तुम्हाला एका वेळी कमीत कमी तुम्हाला ६ महिने वाय-फाय रिचार्ज करावे लागणार आहे. तर त्याच वेळी, जर तुम्हाला प्रीपेड JioFiber इंस्टॉल करायचा असल्यास तर तुम्हाला 1500 रुपये इन्स्टॉलेशन फी भरावी लागणार आहे. 1 महिन्यासाठी मोफत वायफायचा लाभ कसा घ्यायचा? जाणून घ्या.

महिनाभर मोफत मिळवा वायफाय
समजा तुम्ही Jio Fiber वापरकर्ते असाल किंवा नवीन कनेक्शन केल्यास तुम्हाला हे समजले पाहिजे की कंपनी आता तुम्हाला 30 दिवसांसाठी मोफत हाय-स्पीड इंटरनेट देईल. तुम्ही तुमच्या कोणत्याही वायफाय प्लॅनचा पूर्ण १२ महिन्यांसाठी रिचार्ज केला तर तुम्हाला त्याच प्लॅनचे फायदे 1 महिन्यासाठी पूर्णपणे मोफत देण्यात येईल. म्हणजेच रिचार्जचा लाभ 12 महिन्यांऐवजी 13 महिन्यांसाठी देण्यात येईल.
तुम्ही तुमचा सध्याचा JioFiber प्लान 6 महिन्यांसाठी रिचार्ज केला तर तुम्हाला 15 दिवसांसाठी मोफत कनेक्टिव्हिटी देण्यात येईल. 6 महिन्यांनंतरही, तुम्हाला पुढील 15 दिवसांसाठी या योजनेचा लाभ मिळेल.
तुम्हाला जिओच्या अशा अनेक योजना पाहायला मिळतात ज्यात तुम्हाला अधिक वैधतेसह अनेक अनोखे फायदे देण्यात येतात. यामुळे त्याचा फायदा कंपनीच्या वापरकर्त्यांना होईल. समजा तुम्हाला आता एखादा प्लान घ्यायचा असल्यास तर तुम्ही कंपनीच्या अधिकृत साइटवर जाऊन तुमच्या आवडीनुसार किंवा त्याचे फायदे जाणून घेतल्यानंतर कोणताही प्लॅन निवडू शकता.