Vivo Y17s : Vivo ने केला धमाका ! लॉन्च केला जबरदस्त स्मार्टफोन किंमत फक्त ११ हजार

Ahmednagarlive24 office
Published:
Vivo Y17s Launched

Vivo Y17s Launched : Vivo ने आपल्या Y-Series चा नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. याची किंमत अगदीच बजेटमध्ये आहे. Vivo Y17S हा कंपनीचा नवीन फोन आहे.

हा हँडसेट 128 GB स्टोरेज, 6.56 इंच HD+ डिस्प्ले आणि 50MP रियर कॅमेरा यांसारख्या फीचर्ससह येतो. या Vivo फोनची प्रारंभिक किंमत 11,499 रुपये आहे. चला या फोनच्या किंमत व फिचर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊयात –

Vivo Y17s ची किंमत

Vivo Y17S च्या 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,499 रुपये आहे. तर 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 12,499 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. हा Vivo फोन Flipkart, Amazon आणि Vivo India च्या e-store वरून खरेदी करता येईल. हा फोन ग्लिटर पर्पल आणि फॉरेस्ट ग्रीन या दोन रंगात उपलब्ध आहे.

Vivo Y17s चे फीचर्स

Vivo Y17S स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच HD+ वॉटरड्रॉप डिस्प्ले देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये 2.5D फ्लॅट फ्रेम आणि डबल-मिरर डिझाइन आहे. फोनच्या बाजूला फिंगरप्रिंट स्कॅनर दखल देण्यात आला आहे. या Vivo स्मार्टफोनमध्ये 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज आणि 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजचा पर्याय आहे.

स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येते. Vivo Y17s मध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर आहे. रॅम मायक्रोएसडी कार्डद्वारे ४ जीबीपर्यंत वाढवता येते. हा फोन Android 13 आधारित FunTouch OS 13 सह लॉन्च करण्यात आला आहे.

Vivo Y17s चा कॅमेरा

Vivo Y17S स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 2 मेगापिक्सेलचा बोकेह कॅमेरा 50MP प्राइमरी रियर कॅमेरासह आहे. हँडसेटमध्ये 8 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा असून समोरच्या बाजूस ऑरा स्क्रीन लाइट फीचर देण्यात आले आहे. या विवो फोनमध्ये सुपर नाईट मोड, स्टायलिश नाईट फिल्टर आणि बोकेह फ्लेअर पोर्ट्रेट सारखे कॅमेरा फीचर्स देण्यात आले आहेत.

Vivo Y17s ची बॅटरी

Vivo Y17 ला पॉवर देण्यासाठी, 5000mAh ची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे जी 15W FlashCharge तंत्रज्ञानाला सपोर्ट करते. या Vivo फोनमध्ये कॉम्प्रिहेन्सिव 24-डायमेंशन सिक्यॉरिटी प्रोटेक्शन आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल-सिम सपोर्ट, ब्लूटूथ, वाय-फाय, जीपीएस सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe