Ahmednagar Crime : ऊसतोडणी मजूर देण्यासाठी ४४ लाख २५ हजार रुपयांची रक्कम घेऊन पिंपळगाव पिसा येथील इसमाची यांची फसवणूक केली. किरण प्रकाश सरोदे (वय ४०), यांच्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष सीताराम पवार रा. वरसाडे, ठाकुरसिंग वंजारी रा. करमाड खुर्द, व धनसिंग राठोड रा. निंभोरा तांडा, ता. पाचोरा, जि. जळगाव, अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार
फिर्यादी यांना संतोष सीताराम पवार, ठाकुरसिंग वंजारी व धनसिंग राठोड या तिघांनी ऊसतोडणीसाठी मजूर देण्याचे कबूल करून त्यापोटी फिर्यादी सरोदे यांनी गेल्या दोन वर्षांत आरोपींना वेळोवेळी एकूण ४४ लाख २५ हजार रुपये दिले.
मात्र, आरोपींनी ऊसतोडणी मजूर दिले नाहीत, शिवाय त्यासाठी फिर्यादीकडून घेतलेली ४४ लाख २५ हजार रुपयांची रक्कमदेखील आरोपींनी माघारी न दिल्याने किरण सरोदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.