अहमदनगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था ! महामार्ग मृत्यूचा सापळा बनला

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथील नगर – सोलापूर राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर पडलेल्या खड्डयांत पावसाचे पाणी साचल्याने अपघात होऊन अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.

याकडे राष्ट्रीय महामार्ग व चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदाराचे दुर्लक्ष होत आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

तालुक्यातील माहिजळगाव येथे नगर – सोलापूर महामार्गाला छेदून जाणाऱ्या जामखेड – श्रीगोंदा मार्गामुळे येथे चौफुला तयार झाला असून, चारही मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांची नियमित ये, जा सुरू असते.

या मार्गावर डांबर उखडून मोठं मोठे खड्डे पडले आहेत. नुकत्याच झालेल्या पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना अंदाज न आल्याने अपघातांची मालिका सुरू झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

नगर सोलापूर महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून, गावात मुख्य चौफुलीवर पडलेल्या खड्डयांमुळे अपघातांची मालिका सुरू झाली आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती न केल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe