Amitabh Bachchan Film : रजनीकांतचा जबरदस्त सिनेमा येतोय तेही अमिताभ बच्चन सोबत, ३२ वर्षांनंतर दिसणार एकत्र

Ahmednagarlive24 office
Published:
Amitabh Bachchan Film

Amitabh Bachchan Film : अभिनेता प्रभासचा कल्की 2898 हा पुढील वर्षी प्रदर्शित होईल. त्यानंतर आता अमिताभ बच्चन यांनी आणखी एक दाक्षिणात्य चित्रपट साइन केला आहे. विशेष म्हणजे तो रजनीकांतसोबत दिसणार आहे.

‘थलाइवर १७०’ च्या निर्मात्यांनी ही बातमी जाहीर केली आहे. ३ ऑक्टोबर रोजी चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर घोषणा केली की रजनीकांत आणि अमिताभ बच्चन ३२ वर्षांनंतर पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

1991 मध्ये आलेल्या ‘हम’ या चित्रपटात ते एकत्र दिसले होते.

दक्षिणेतील दिग्गज निर्माता लायका प्रॉडक्शनने त्याच्या अधिकृत ट्विटर (एक्स) वर याबाबत सांगितले आहे. ‘थलाइवर १७०’ मध्ये भारतीय सीएंमांचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांचे स्वागत आहे असे त्यात म्हटले आहे.

या चित्रपटात पुष्पा मध्ये धडाकेबाज पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका बजावली होती असे फहद फासिल आणि राणा दग्गुबती देखील आहेत. रजनीकांत यांचा हा दक्षिणेतील १७० वा चित्रपट आहे. चित्रपटाचे टायटल नंतर जाहीर केले जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट लवकरच फ्लोरवर जाणार आहे.

सामाजिक संदेश देणारा हा मनोरंजक चित्रपट असेल. आज रजनीकांत चेन्नईहून तिरुअनंतपुरमला रवाना झाले. दिग्दर्शक ज्ञानवेल आणि निर्माते लायका यांच्यासोबत मी एक चित्रपट करत आहे, जो चांगल्या मनोरंजनासोबतच सामाजिक संदेश देणारा चित्रपट असेल, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. चित्रपटाचे नाव मात्र अद्याप ठरलेले नाही.

* कोर्टरूम ड्रामा सेक्शन ८४

अनिरुद्ध रविचंदर या चित्रपटाला संगीत देणार आहेत. चित्रपटात रितिका सिंग, मंजू वॉरियर आणि दुशारा विजयन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. रजनीकांत नुकताच बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या जेलर या सिनेमात दिसला होता.

हा १० ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि आता तो OTT वर देखील पाहता येतोय. अमिताभ बच्चन सध्या कोर्टरूम ड्रामा सेक्शन ८४ चे शूटिंग करत आहेत. अमिताभ सध्या कौन बनेगा करोडपतीच्या सीझनच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.

या महिन्यात अमिताभ टायगर श्रॉफ आणि कृति सेननसोबत गणपत-भाग १ मध्ये दिसणार आहेत. यानंतर पुढील वर्षी जानेवारीमध्ये दीपिका पदुकोण आणि प्रभास स्टारर कल्की 2898 एडी या चित्रपटातही दिसणार आहेत.