देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. परंतु कर्नाटकातील एका भाजपच्या आमदाराच्या मुलाला लॉकडाऊन बद्दल माहित नाही कि काय? असा सवाल नागरिक विचारात आहेत.
त्याचे कारण असे की, भाजपचे आमदार सीएस निरंजन यांचे पुत्र हायवेवर घोडा पळवताना दिसले.
त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकर्यांनी भाजपला धारेवर धरले आहे.
जेव्हा हा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा कायदे केवळ सामान्य माणसांसाठीच असतात का? असा सवाल विचारला आहे.
निरंजनने कुठल्याही प्रकारचा मास्क घातला नव्हता. म्हणजेच त्याने लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे.
या प्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही अशी माहिती स्थानिक अधिकार्यांनी दिली आहे.
तसेच याबाबत पुढील तपास सुरू आहे असेही त्यांनी सांगितले.