Sunny Deol Films : गदर 2 च्या यशानंतर सनी देओलचे नशीब जोरावर, येतायेत ‘हे’ 6 सिनेमे

Sunny Deol Films

 

Sunny Deol Films : सनी देओल बॉलिवूड मधील एक सुपरस्टार आहे. 90 च्या दशकात सनी देओलच्या बहुतांश सिनेमांनी अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. आता नुकत्याच आलेल्या ‘गदर 2’ ने प्रचंड या कमवले. तसेच भरपूर कमाई केली.

त्यामुळे आता सनी देओलच्या करिअरमध्ये गती आली आहे. या चित्रपटाच्या जबरदस्त यशाने सनी देओलच्या कारकिर्दीला इति चालना दिली आहे की, प्रत्येकजण त्याला आपल्या चित्रपटात साईन करू इच्छित आहे.

सनी देओलची काही चित्रपटांमध्ये एन्ट्री निश्चित झाली आहे तर काही चित्रपटांमध्ये त्याला कास्ट करण्याची चर्चा आहे. जाणून घ्या त्या चित्रपटांची नावे ज्यात सनी देओल दिसण्याची शक्यता आहे.

गदर 3

‘गदर 2’च्या यशानंतर ‘गदर 3’च्या चर्चानी जोर धरला आहे. अनिल शर्मा यांनीही अनेक मुलाखतींमध्ये याचे संकेत दिले आहेत. पण तिसरा भाग बनवायला फारसा उशीर केलं जाणार नाही, हे स्पष्ट आहे.

लाहोर 1947

आमिर खानने नुकतीच ‘लाहोर 1947’ची घोषणा केली आहे. या चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत असणार असून आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली त्याची निर्मिती होणार आहे, तर राजकुमार संतोषी दिग्दर्शित करणार आहेत.

बॉर्डर 2

सनी देओलने यापूर्वी एका मुलाखतीत खुलासा केला होता की, ‘बॉर्डर 2’ बनवण्याची योजना 2015 मध्ये सुरू झाली होती. रिपोर्ट्सनुसार, आयुष्मान खुराना हा देखील सिनेमात असू शकतो. पण अद्याप कास्टिंग फायनल झालेले नाही.

सन ऑफ सरदार 2

एका वृत्तानुसार, सनी देओल अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा आहे. पटकथेचे कामही सुरू झाले आहे, परंतु अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

बाप व सूर्या

गेल्या वर्षी ‘बाप’ चित्रपटाची घोषणा झाली होती. यात सनी व्यतिरिक्त जॅकी, मिथुन चक्रवर्ती आणि संजय दत्त देखील असतील. याशिवाय मल्याळम चित्रपट ‘सूर्या’च्या हिंदी रिमेकमध्ये सनी देओल हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे.