Ahmednagar News : डोक्यात फरशी घालुन येथील शाहरूख शहा (वय 28) नावाच्या तरुणाचा खून झाला होता. बुधवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास येथील संगमनेर रोडवरील एका हॉटेल मागे ही घटना घडली. सदर गुन्ह्यात शहर पोलिसांनी तात्काळ दोन आरोपींना ताब्यात घेतले होते.
पोलिसांनी काल गुरुवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सदर आरोपींना हजर केले असता, न्यायाधीश श्रीमती मोरे यांनी सदर आरोपींना (दि. १०) ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक आव्हाड करीत असून सरकारी वकील अग्रवाल यांनी बाजु मांडली. तर आरोपी तर्फे अॅड. आरिफ शेख काम पाहत आहे. आरोपींना केवळ संशयावरून खोटे गुंतवण्यात आल्याचा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला आहे.