Jio Prepaid Plan : जिओने लाँच केले शानदार प्लॅन! अनलिमिटेड डेटासह मिळतील अनेक फायदे, किंमत आहे फक्त…

Ahmednagarlive24 office
Published:
Jio Prepaid Plan

Jio Prepaid Plan : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत कोणते ना कोणते रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. कंपनीचे प्लॅन एअरटेलला कडवी टक्कर देत असतात.

जर तुम्ही कंपनीचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणले आहेत. ज्यात तुम्हाला अनलिमिटेड डेटासह Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल. जाणून घ्या प्लॅनची किंमत.

रिलायन्स जिओचा 3662 रुपयांचा प्लॅन

या प्री-पेड प्लॅनमध्ये कंपनीच्या ग्राहकांना एक वर्षाची वैधता देण्यात येत आहे. यात तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग सुविधेसोबत दररोज 2.5GB डेटा देण्यात येत आहे. इतकेच नाही तर तुम्हाला अनलिमिटेड 5G डेटा आणि दररोज 100 SMS ची सुविधा मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला SonyLiv आणि Zee5 चे सब्सक्रिप्शन देण्यात येत आहे. तसेच तुम्हाला Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे फ्री सब्सक्रिप्शन देण्यात येत आहे.

रिलायन्स जिओचा 3226 रुपयांचा प्लॅन

जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह, 2GB 4G डेटा आणि अनलिमिटेड 5G डेटा दररोज दिला जात आहे. एवढेच नाही तर या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 एसएमएसच्या सुविधेसोबत 365 दिवसांची वैधता मिळेल. तसेच इतर फायद्यांमध्ये SonyLiv, JioTV, JioCinema आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

रिलायन्स जिओचा 3225 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 2GB डेटासह अनलिमिटेड 5G डेटा मिळेल. तसेच या प्लॅनमध्ये SonyLiv आणि Zee5 सबस्क्रिप्शनचा लाभ मिळतो आणि दररोज १०० एसएमएसची सुविधाही मिळते.

रिलायन्स जिओचा 1999 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड 5G डेटा आणि एक वर्षासाठी कॉलिंगचा लाभ घेता येईल. यासोबतच तुम्हाला दररोज 2.5GB डेटा आणि 100 SMS ची सुविधा मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe