Electric Tata Harrier : ऑटो एक्स्पोमध्ये टाटा हॅरियर ईव्हीचे कॉन्सेप्ट व्हर्जन सादर करण्यात आले होते. या मॉडेलची प्रायमरी टेस्ट सध्या सुरु आहे. नुकतेच त्याचे काही स्पाय फोटो समोर आले आहेत, त्यामधून या कारबद्दल काही माहिती समोर आली आहे.
आगामी इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये हॉरिजोंटल स्लॅट डिझाइनसह क्लोज्ड ग्रिल, स्प्लिट सेटअपसह एलईडी हेडलॅम्प्स, फ्रंट एलईडी लाइट स्ट्रिप आणि एलईडी डे टाइम रनिंग लाइट (डीआरएल) आदी गोष्टी दिसतील.
* Tata Harrier.ev चे फीचर्स
प्रॉडक्ट-रेडी व्हर्जनमध्ये फेंडर्सवर ईव्ही बॅज, मोठे अलॉय व्हील, फ्लश डोअर हँडल्स, बॉडी क्लेडिंगसह अधिक एंगुलर रियर बंपर आणि नवीन रियर एलईडी लाइट बार मिळू शकतो. या एलईडी लाइट बारमध्ये टेल लॅम्प जोडले जातील. हाती आलेली स्पाय इमेजेसमध्ये या ईव्हीच्या इंटिरिअरची झलक ही पाहायला मिळते. यात फ्री स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक असेल. इलेक्ट्रिक हॅरियर टाटाच्या नवीन ट्विन-स्पोक स्टीअरिंग व्हीलसह येण्याची शक्यता आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर यात एडीएएस, 360 डिग्री कॅमेरा, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस चार्जर, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक वेदर कंट्रोल, सराउंड लाइटिंग आणि वेंटिलटेड फ्रंट सीट असू शकतात.
* टेक्निकल स्पेसिफिकेशन्स
टेक्निकल स्पेसिफिकेशन्सचे डिटेल्स अद्याप अधिकृतरित्या समोर आले नसले तरी असा अंदाज आहे की टाटा हॅरियर . ईव्ही 400-500 किमीच्या रेंजसह येऊ शकते आणि 50 किलोवॉट ते 60 किलोवॅट दरम्यान बॅटरी असू शकते. विशेष म्हणजे हॅरियरच्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये ड्युअल मोटर सेटअपसह ऑल व्हील ड्राइव्ह सिस्टीम देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक हॅरियर टाटाच्या जेन-2 ईव्ही प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे.