Tata Harrie and Safari : टाटा ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात मोठी व लोकप्रिय अशी कार विक्री करणारी कंपनी आहे. टाटा मोटर्सने आजपासून हॅरियर आणि सफारी फेसलिफ्ट एसयूव्हीसाठी बुकिंग सुरू केले आहे. दोन्ही एसयूव्ही ऑक्टोबरमध्ये लाँच होतील.
जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्ही ऑनलाइन पोर्टल किंवा जवळच्या डीलरशिपवर जाऊन केवळ 25,000 रुपयांमध्ये ती बुक करू शकता. कंपनीने त्याची किंमत जाहीर करताच डिलिव्हरी सुरू होईल. ही कार ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस यांना टक्कर देईल.

Tata Harrier, Safari facelift
टाटा हॅरियर फेसलिफ्ट आणि सफारी फेसलिफ्ट एसयूव्ही येत्या काही आठवड्यात भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. टाटा मोटर्सने हॅरियर आणि सफारी फेसलिफ्ट एसयूव्ही लाँच करण्यापूर्वी सोशल मीडिया हँडलवर टीज केल्या आहेत. दोन्ही मॉडेल्समध्ये डिझाइन, फीचर्स आणि पॉवरट्रेनसह अनेक बदल करण्यात आले आहेत. चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात-
Tata Harrier, Safari facelift चा लूक
हॅरियर फेसलिफ्ट एसयूव्ही नवीन फ्रंट फेससोबत येणार आहे. या मुख्य बदलांमध्ये, एक अपडेटेड ग्रिल मिळणार आहे. यात अपडेटेड ग्रिल आहे. दोन्ही बाजूला व्हर्टिकल स्प्लिट हेडलाईट सेटअप असून बोनेटवर एलईडी डीआरएल लावण्यात आले आहेत. मागील बाजूस यात कनेक्ट लाइट बार फीचर देण्यात आले आहे जे सफारी फेसलिफ्टमध्ये देखील मिळते.
Tata Harrier, Safari facelift चे इंटीरियर
कारच्या आतील बाजूस 12.30 इंचाची इंफोटेनमेंट स्क्रीन, 10.25 इंचाचा डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर मिळेल जो 2023 नेक्सॉन आणि नेक्सॉन ईव्ही प्रमाणेच दिसेल. नवीन हॅरियरच्या केबिनच्या डॅशबोर्डवर आतून शानदार लुक देण्यात आला आहे. यात एम्बिएंट लाइटिंग असेल. नवीन हॅरियर नवीन टू-स्पोक स्टीयरिंग व्हीलसह बॅकलिट पॅनेल येईल ज्यामध्ये टाटा मोटर्स लोगो आणि माउंटेड कंट्रोल्स असतील.
Tata Harrier, Safari facelift चे फीचर्स
इतर फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर यात पॉवर टेलगेट्स, हार्मन ऑडियोवर्क्स सह 10 जेबीएल स्पीकर साउंड सिस्टीम, पॅडल शिफ्टर्स, 360 डिग्री कॅमेरा आहे. टाटा हॅरियरसोबतच नवीन सफारीमध्ये देखील किमान 11 सेफ्टी फीचर्स असतील. यात लेव्हल-2 एडीएएस तंत्रज्ञानही असणार आहे.
अनेक अपडेटेड फीचर्स
सफारी एसयूव्हीच्या इंटिरियरमध्ये हॅरियर फेसलिफ्ट एसयूव्हीसारखेच अपडेट मिळण्याची शक्यता आहे. अपडेट केबिनमध्ये नवीन फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, डिजिटल लोगोसह नवीन टू-स्पोक स्टीअरिंग व्हील सेटअप आणि इतर फीचर्स असण्याची अपेक्षा आहे.