Ahmednagar Crime : खुनाचा प्रयत्न करणारे आरोपी ताब्यात

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar Crime : मागील भांडणाचे कारणावरून एकाला निर्जन स्थळी नेत धारदार हत्याराने त्याच्या डोक्यावर वार करत त्याच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने विळद बायपास परिसरात पकडले आहे.

हर्षद गौतम गायकवाड (रा.दूध डेअरी चौक, विखे पाटील कॉलेज रोड, वडगाव गुप्ता शिवार) व बाळु शंकर काळे (रा. चेतना कॉलनी, नवनागापुर) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.

या दोघा आरोपींनी २६ सप्टेबर रोजी रात्री ७ च्या सुमारास महेश बाबासाहेब आरु (रा. गजानन कॉलनी, नवनागापुर ) यांना विखे पाटील हॉस्पीटल चायना गेट जवळ बंद पडलेल्या शेडमध्ये नेवून मागील भांडणाचे कारणावरून धारदार हत्याराने डोक्यावर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

याबाबत महेश आरु यांच्या फिर्यादी वरून दोघांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३०७, ३२३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास करत असतांना स. पो. नि. राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की,

सदर गुन्हयातील आरोपी हर्षद गायकवाड व बाळु काळे हे विळद बायपास या ठिकाणी लपुन बसलेले आहेत. ही माहिती मिळताच स.पो. नि. सानप यांनी पथक पाठवून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe