ब्रेकिंग ! जयंत पाटलांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली, सुप्रिया सुळेंनी अभिनंदन करताच राजकीय चर्चांना उधाण

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : सध्या महाराष्ट्रातील राजकारण कधी काय वळण घेईल हे सांगता येत नाही. सध्या राष्ट्रवादीचा एक गट भाजप सोबत आहे. परंतु भाजप मात्र जयंत पाटलांना आपल्याकडे ओढण्यासाठी जोर लावत आहे.

आता जयंत पाटील यांना अजितदादा गटात आल्यास तुम्हाला मुख्यमंत्री करू, अशी ऑफर देण्यात आलीय. म्हणजे तशी जोरदार चर्चा सुरु आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी जे विधान केलंय त्याने मात्र चर्चाना उधाण आलं आहे. त्या म्हणाल्यात की, जयंत पाटील अजितदादा गटाकडे गेल्यास त्यांना मुख्यमंत्री केलं तर चांगलंच आहे.

ही आनंदची बातमी आहे. जयंतराव मुख्यमंत्री झाले तर मला आनंद होईल. सुप्रिया सुळे यांच्या या विधानावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. विरोधकांना पराभूत करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. ती एक अदृश्य शक्ती आहे त्याबद्दल शंका नाही.

दिल्लीत एक अदृश्य शक्ती आहे. ही अदृश्य शक्ती महाराष्ट्राच्या विरोधात काम करत आहे. शिवसेना असो, राष्ट्रवादी असो वा देवेंद्र फडणवीस, ही अदृश्य शक्ती षड्यंत्र रचत आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. सुप्रिया सुळे यांनी आय सी ई हा नवीन शब्द वारला.

आईस म्हणजे बर्फ नव्हे. आयसीई म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी. केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्वांना आपल्या काबूत ठेवण्यासाठी ‘आईस’ चा वापर करत आहे. त्याविरोधात कोणी बोलले तर त्याला वरील तिघांच्या धाडी टाकून गप्प केलं जात आहे. असे त्या म्हणाल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe