Grah Gochar : शनीच्या नक्षत्र बदलाला वैदिक ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. जेव्हा शनि एका नक्षत्रातून किंवा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा इतर सर्व राशींवर प्रभाव दिसून येतो. शनीने मार्च 2023 मध्ये शतभिषा नक्षत्रात प्रवेश केला होता आणि आता तो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
यावेळी नवरात्री १५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. १४ ऑक्टोबरला सूर्यग्रहणही होणार आहे. अशातच चार राशींसाठी शनीचे संक्रमण अतिशय शुभ मानले जात आहे. शनीच्या या हालचालीचा फायदा काही राशींना होणार आहे, तसेच काही राशींसाठी नवीन प्रगतीचे दरवाजे देखील उघडतील.
‘या’ राशींसाठी शनीचे संक्रमण ठरेल फायदेशीर :-
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण खूप शुभ मानले जात आह. या वेळी नोकरीत तुमचे कौतुक होईल आणि पदोन्नती मिळू शकते. तसेच तुमचे उत्पन्न वाढू शकते, आणि संपत्तीत वाढ होऊ शकते. यामुळे तुमचे मन शांत असेल, तसेच वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ देखील मिळू शकतो. या काळात खर्चावर नियंत्रण ठेवा.
मेष
मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच मालमत्ता आणि वाहन खरेदीची शक्यता देखील आहे. यावेळी या राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये यशाच्या नवीन संधी मिळतील. तसेच आर्थिक समस्यांपासून दिलासा मिळेल. त्यामुळे तुमच्या मनावरील ओझे कमी होईल, आणि तुम्ही पुन्हा नव्याने सुरवात कराल.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण देखील फायदेशीर ठरेल. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. मानसिक तणावातून आराम मिळेल आणि आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल. करिअर आणि नोकरीमध्ये येणारे अडथळे दूर होतील. घरात सुख-शांतीचे वातावरण राहील आणि न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळेल.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा कायम राहील. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम आहे. पदोन्नतीची शक्यता आहे. भौतिक सुख-सुविधांचा लाभ मिळेल. नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल. त्यामुळे तुम्ही उत्साही असाल.