राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली, फडणवीसांचा राजीनामा घ्या – खासदार सुप्रिया सुळे

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला होतो ही एकप्रकारे शरमेची बाब आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, जालनामध्ये आंदोलकांवर लाठीहल्ला होतो, आता त्या पाठोपाठ नगरमध्ये सामाजिक कार्यकर्ते कुलकर्णी यांच्यावरसुद्धा अशा प्रकारचा हल्ला होत असेल तर ही मोठी शोकांतिका आहे.

या सरकारला फक्त फोडाफोडी जमते. या ट्रिपल इंजिन सरकारला सर्व बाबतीमध्ये अपयश आले आहे, गृह खात्याला सुद्धा सर्व बाबतीत अपयश आले, म्हणून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

जोपर्यंत कुलकर्णी यांच्या मारेकऱ्याचा छडा लागत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असे सांगून त्या म्हणाल्या की, पोलीस ठाण्यामध्ये जाऊन जर कुलकर्णी यांना न्याय मिळत नसेल तर राज्यामध्ये सर्वसामान्यांचे काय हाल असतील हे सांगायला नको

मंत्री हे लाल दिव्याच्या गाडीतून फिरतात, वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा करतात, प्रत्यक्षात मात्र कोणतीच कामे करत नाही, असा आरोपसुद्धा त्यांनी केला. राज्यात गुटखाबंदी झाली पाहिजे, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकार असताना त्यावेळेस मांडली.

त्यावेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार हेच होते, त्यांनी आमची मागणी मान्य करत यासंदर्भात तात्काळ शासन निर्णय घेतला व त्याची अंमलबजावणी सुरू झाली. आता सरासपणे गुटका विक्री होत आहे.

नगर जिल्ह्यामध्ये तर आता प्रत्येक ठिकाणी त्याचा वापर होताना दिसत आहे, मग राज्य सरकार करतं काय हे सगळे मोकाट सुटले आहे, जिथे जिथे पाहावे तिथे तिथे अवैध धंदे हे वाढत चालले आहे. हे सर्व पाप या राज्य सरकारचे आहे, अशीही टीका त्यांनी केली.

राज्यामध्ये मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम या सर्वांना आरक्षण मिळाले पाहिजे पण हे भारतीय जनता पार्टीचे धोरण बोलायचं एक आणि करायचं एक असं आहे. केंद्रामध्ये ते एक बोलतात व राज्यांमध्ये ते दुसरे बोलतात, त्यामुळे हे सरकारच आरक्षणाच्या बाबतीमध्ये फक्त आश्वासन देत

कृतीमध्ये मात्र वेगळ्या पद्धतीने वागतं असा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केला. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे इथं म्हणतात केंद्रामध्ये मात्र वेगळी भूमिका मांडतात अशीच यांची इतर आरक्षणाच्या बाबतीत भूमिका असते त्यामुळे हे फक्त जुमलेबाज सरकार आहे असे त्या म्हणाल्या

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe