Ahmednagar News : महाराष्ट्रात गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ आरोपीच्या बरॅकमध्ये मोबाईल !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रात गाजलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील अमानुष मारहाण प्रकरणातील आरोपी युवराज गलांडेच्या रॅकमध्ये नुकताच मोबाईल सापडला आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्याची मागणी येथील रिपाई व भीमशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सात ऑक्टोबर रोजी श्रीरामपूर कारागृहाची तपासणी केली असता, जेलमध्ये तीन मोबाईल, एक इंजेक्शन, विडीचे मंडल आढळून आले.

हे सर्व त्यांना पुरवणाऱ्या अधिकान्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ झेंडाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांच्या वतीने नायब तहसीलदार राजेंद्र वाघचौरे यांना काल सोमवारी देण्यात आले.

याबाबत विजया चारसे यांनी तहसीलवार मिलिंद कुमार वाघ यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, श्रीरामपूरच्या जलरच्या मदतीने आरोपींना सर्व सुखसोयी पुरवल्या जातात. मटणाच्या भाजीचे डब्बे, गुटखा, विड्या दिल्या जातात, असा आरोप केला होता.

त्यानंतर नायब तहसीलवार राजेंद्र वाकचौरे, शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय जीवन बोरसे, पीएसआय सुरेखा देवरे, तसेच दहा-बारा पोलिसांच्या पथकाने कारागृहाची तपासणी केली असता, हरेगाव प्रकरणातील आरोपी युवराज गलांडे त्याचे साथीदार असलेल्या बरैंक नंबर पाच मध्ये तसेच इतरही बराक मध्ये तीन मोबाईल, इंजेक्शन, विडी बंडल आढळून आले.

त्यामुळे सदर आरोपींकडे मोबाईल आढळले ते कुणाच्या मदतीने त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, तसेच तहसीलदार मिलिवकुमार बाघ यांनी जेलरला तेथून काढले आहे. परंतु जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा,

अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर, विजया बारसे, नाना शिंदे, राहुल जाधव आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe