नवरात्रीपूर्वीच आली खुशखबर ! कर्मचाऱ्यांचा डीए झाला पक्का, 27 हजारांनी वाढणार पगार

Ahmednagarlive24 office
Published:

नवरात्री व दिवाळीच्या सणाआधीच कर्मचाऱ्यांना खुशखबर मिळणार आहे. या सणाआधीच केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना वाढीव पगार देऊ शकते.

अनेक दिवसांपासून महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्त्यासह मागील महिन्यांची थकबाकी मिळू शकणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ ऑक्टोबरच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता वाढीला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणार असून कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनाचा लाभ मिळणार आहे. एआयसीपीआय निर्देशांकानुसार सरकार यावेळीही महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करू शकते.

जूनमध्ये हा आकडा किती होता? :- एका मीडिया रिपोर्टनुसार, जूनमध्ये निर्देशांक 136.4 पॉईंट होता. त्या आधारे डीए स्कोअर 46.24 वर पोहोचला आहे. याचा अर्थ डीएमध्ये एकूण 4% वाढ झाली आहे.

बेसिक सॅलरी – 56,900 असेल तर..
>> बेसिक सॅलरी – 56,900 रुपये
>> नवीन डीए (46 टक्के) – 26,174 रुपये प्रति महिना
>> आताचा डीए (42 टक्के) – 23,898 रुपये प्रति महिना
>> किती वाढला डीए – 2276 रुपये प्रति महिना
>> वार्षिक वाढ किती होईल – 27312 रुपये

बेसिक सैलरी – 18,000 असेल तर..
>> बेसिक सॅलरी – 18,000 रुपये
>> नवीन डीए (46 टक्के) – 8280 रुपये प्रति महिना
>> आताचा डीए (42 टक्के) – 7560 रुपये प्रति महिना
>> किती वाढला डीए – 720 रुपयेप्रति महिना
>> वार्षिक वाढ किती होईल – 8640 रुपये

महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ होणार :- सातव्या वेतन आयोगांतर्गत सरकार कर्मचाऱ्यांच्या पगारात 4 टक्के वाढ करणार आहे. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा डीए 46 टक्के होईल. याचा लाभ 1 जुलै 2023 पासून कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe