Ahmednagar News : रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुरू असलेले उपोषण मागे

Ahmednagarlive24 office
Updated:
Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव शहर व ग्रामीण हद्दवाढ झाल्यामुळे एकत्र आल्यानंतर शहरातील जुना टाकळी नाका ते खडकी हा रस्ता रहदारीचा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा रोड ३० मीटर होऊन दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण व्हावा,

या मागणीसाठी खडकी येथील नागरिकांनी केलेल्या उपोषणाची दखल घेत मुख्याधिकारी व तहसीलदार यांनी हा रस्ता करून देण्याचे मान्य केले आहे. याबाबत उपोषणकर्त्यांना मुख्याधिकारी शांताराम गोसावी व नायब तहसिलदार विकास गंबरे यांनी अश्वस्त केले आहे. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांनी उपोषण करताना सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतरीत असून तातडीने खड्डे बुजवण्यात येतील. तसेच या रस्त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून अनुदान प्राप्त होताच रस्त्याचे काम करण्यात येईल, असे सांगितले.

त्याचप्रमाणे अयोध्यानगरी भागात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनचेही काम सुरू करण्यात येईल. प्रारंभी माजी नगरसेविका ताराबाई जपे यांनी येथील पार्श्वभूमी सांगुन दैनंदिन सुविधापासून खडकी प्रभाग कसा वंचित आहे व त्यासाठी आपण पालिकास्तरावर प्रत्येक मासिक बैठकीत केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली.

अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान म्हणाले की, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी खडकी व अयोध्यानगरी रहिवासीयांच्या भावना लक्षात घेवुन त्याबाबत जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या स्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे.

उपोषणकर्त्यांनी प्रभाग १ व २ अंतर्गत खडकी भाग, जुना टाकळी नाका, समतानगर, साईसिटी, शिंगी, शिंदेनगर, वृंदावननगर या परिसरातही मुलभूत सुविचाचा अभाव आहे. त्याकडे पालिका प्रशासनाने वेळीच लक्ष देवुन त्याची सोडवणुक करावी, असे सांगितले.

नायब तहसिलदार विकास गंबरे यांनी खडकी अतिवृष्टी बाधितांना नुकसान भरपाई मिळण्याबाबतच्या सर्व प्रस्तावाची पुर्तता करून त्यास निधी प्राप्त होताच या संबधीतांच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा केली जाईल, असे आश्वासन दिले. कोपरगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी राऊत यावेळी उपस्थित होते. दिपक जपे यांनी आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe