Maharashtra News : समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख हे काल येथील न्यायालयात अनुपस्थित राहिले. इंदुरीकर महाराज समन्स बजावणीसाठी पोलिसांना भेटले नसल्याने न्यायालयात हजर राहण्यासाठी त्यांना पुढील तारीख ९ नोव्हेंबर देण्यात आली आहे.
वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात २०२० साली पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव अँड.रंजना गवांदे यांनी देशमुख यांच्या विरोधात संगमनेर येथील न्यायालयात तक्रार केली होती.
ही केस थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही केस पुन्हा संगमनेर न्यायालयात पाठवली. निवृत्ती महाराज देशमुख यांना समन्स पाठवून आज न्यायालयात हजर राहण्यायास सांगितले होते. मात्र ते न्यायालयात हजर राहिले नाही.
निवृत्ती महाराज देशमुख यांनी आज कोर्टात जामीन देणे अपेक्षित होते. कोर्टाचे समन्स पोहचलेच नसल्याची माहीती समोर आली आहे. यामुळे निवृत्ती महाराज देशमुख यांना न्यायालयात हजर होण्यासाठी पुढील तारीख ८ नोव्हेंबर देण्यात आली आहे.
निवृत्ती महाराज देशमुख यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये जामीन देण्यासाठी संगमनेर येथील न्यायालयात यावेच लागेल, असे याचिकाकर्त्या अँड. गवांदे यांनी सांगितले.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्यामार्फत देशमुख यांना समन्स बजवावा, अशी मागणी आपण न्यायालयात केली असून न्यायालयात हजर राहिले नाही तर त्यांच्याविरुद्ध वॉरंट निघू शकतो, असे गवांदे यांनी सांगितले.