JioBharat B1 : जिओने आपला नवीन जिओ भारत सीरिजचा फोन जिओभारत बी 1 भारतात लाँच केला आहे. नवीन जिओ फोन हा कंपनीच्या जिओभारत व्ही 2 आणि के 1 कार्बन मॉडेलचे थोडे अपग्रेड व्हर्जन आहे.
टेलिकॉम कंपनीने नवीन जिओ भारत बी 1 फीचर फोन कंपनीच्या वेबसाईट आणि अॅमेझॉन इंडियावर लिस्ट केला आहे. नवीन आलेला हा जिओभारत बी 1 हा एक बेसिक फीचर फोन आहे जो 4 जी कनेक्टिव्हिटीसह येतो.

या फोनमध्ये यूपीआय पेमेंटची सुविधा देखील उपलब्ध आहे. याठिकाणी आपण JioBharat B1 या नवीन फोनची किंमत आणि फीचर्स बद्दल जाणून घेऊयात –
JioBharat B1 ची किंमत
जिओभारत बी1 सीरिजचा फीचर फोन केवळ 1,299 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. नवीन फोन जुन्या आणि नवीन जिओ सिमकार्डसह काम करतो. मात्र यासाठी युजर्संना १२३ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज करावे लागणार आहे.
JioBharat B1 Seriesचा फीचर फोन देशात सिंगल ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. हा हँडसेट अॅमेझॉन आणि अधिकृत जिओ स्टोअरवरून खरेदी करता येईल.
JioBharat B1 स्पेसिफिकेशन्स व फीचर्स
जिओभारत बी 1 फीचर फोनमध्ये मागील जिओभारत स्मार्टफोनपेक्षा मोठा डिस्प्ले आणि बॅटरी आहे. बी 1 फीचर फोनमध्ये 2.4 इंचाचा डिस्प्ले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की 4 जी कनेक्टिव्हिटीमुळे यूजर्स फोनवर चित्रपट आणि व्हिडिओ देखील पाहू शकतात.
याशिवाय या हँडसेटमध्ये 2000 mAhची बॅटरी देण्यात आली आहे. जिओभारत बी 1 सीरिजचा फीचर फोन प्लॅस्टिकपासून बनलेला असून बॅक पॅनेलवर टू-टोन फिनिश देण्यात आला आहे. पॅक पॅनेल मॅट फिनिशसह येतो आणि मध्यभागी जिओ लोगो दिसत आहे. फोनचा कॅमेरा मॉड्यूल ग्लॉसी फिनिश ऑफर करतो. फोनच्या मागील बाजूस स्पीकर ग्रिल देखील आहे.
जिओभारत सीरिजमधील इतर मॉडेल्सप्रमाणेच जिओसिनेमा आणि JioSaavn अॅप्स या नवीन बी 1 फोनमध्ये प्री-इन्स्टॉल करण्यात आले आहेत. जिओभारत बी 1 फोनवर युजर्स अनेक भाषांमध्ये गेम, व्हिडिओ आणि चित्रपटांचा आनंद घेऊ शकतात.
जिओभारत बी 1 मध्ये 23 भाषांचा नेटिव सपोर्ट मिळतो. युजर्स या फीचर फोनमध्ये यूपीआय पेमेंटसाठी जिओपे अॅपचा वापर करू शकतात. क्यूआर पेमेंट कॅमेऱ्याने स्कॅन करता येते.