दीड लाख महिलांना घडविणार मोहटादेवीचे दर्शन ! आ.निलेश लंके यांची माहिती

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : शारदीय नवरात्रोत्सव काळात पारनेर-नगर मतदार संघातील सुमारे दौड लाखापेक्षाही जास्त महिला मोहटादेवी दर्शनासाठी येतील. या यात्रेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार असून या देवदर्शन यात्रा सोहळ्याची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे.

दररोज समारे १२५ ट्रॅव्हल्स व शंभर इतर चारचाकी वाहनांची सोय करण्यात आली आहे. ही सर्व यात्रा निर्विघ्न पार पडण्यासाठी सुमारे ११ हजार स्वयंसेवक तन-मन-धनाने अहोरात्र कार्यरत राहणार असून यासाठी मोहटा देवस्थानसह मोहटा ग्रामस्थ व तालुक्यातील कार्यकत्यांचे मोठे सहकार्य लाभत असल्याची माहिती पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी मोहटा येथे पत्रकार परिषदेत दिली.

आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित मोहटादेवो दर्शन यात्रेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आ.ल मोहटादेवी गडावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वचितचे तालुकाध्यक्ष रविंद्र उर्फ भोरू म्हस्के, रणजित बेळगे, अर्जुन घायतडक, ज्वेद आतार, महेश दौंड, धनंजय घोडके, संदिप पालवे, महादेव दहिफळे आदीसह कार्यकतें उपस्थित होते.

यावेळी बोलताना लंके म्हणाले की, मागील ७ वर्षांपासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी नवरात्रोत्सव काव्यात मोहटादेवी दर्शन यात्रा आयोजित करण्यात येते. आजपर्यंत या उपक्रमाला पारनेर-नगर तालुक्यातील जनतेने मोठा प्रतिसाद देत लाखो महिला भाविकांनी याचा लाभ घेतला.

कालपर्यंत सुमारे ९२ हजार महिलांची नोंदणी पूर्ण झाली असून ही संख्या सव्वा लाख ते दीड लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. यावर्षी गडावर येणाऱ्या इतर भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी देवस्थान व प्रतिष्ठानने घेतली असून या यात्रेतील भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांग निर्माण करण्यात येणार आहे.

स्वतंत्र वाहनतळ, फराळाची व्यवस्था व इतर सुविधा यात्रेकरूंना देण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे प्रतिष्ठानचे १ हजार स्वयंसेवक दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. मागील सर्व यात्रेचा अनुभव लक्षात घेता देवस्थान व प्रशासनाशी बोलणी झाली असून वाहतूक कोंडी होणार नाही.

नगर-पाथर्डी दरम्यानचे राष्ट्रीय महामार्गाचे काम आम्ही केलेल्या आंदोलनानंतर पूर्ण झाले असून यावर्षी त्यामुळे भाविकांचा प्रवास सुखरूप होणार आहे. अनेक वर्षे रखडलेला राष्ट्रीय महामागांच्या पूर्णत्वाच्या श्रेयवादात मला पडायचे नसून सर्व जनतेला माहित आहे कोणाच्या प्रयत्नामुळे हा रस्ता पूर्ण झाला.

या रस्त्यासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शिष्टाईनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मोठे सहकार्य लाभले. मोहटादेवी व पाथर्डी तालुक्याशी माझे एक वेगळे नाते आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe