अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- कोरोनाने जगभर थैमान घातले असून जगभरातील शास्त्रज्ञ यावर उपाययोजना शोधत आहेत. या संशोधनातच चीनच्या शास्त्रज्ञांना एक बाब लक्षात आली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यू कारण शोधून काढलं आहे.
साइटोकाइन स्टॉर्म सिंड्रोम असं यामागच कारण संगितले आहे. साइटोकाइन स्टॉर्म सिंड्रोम म्हणजे कोरोनाव्हायरसच्या गंभीर रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता अतिसक्रिय होणे.
फ्रंटियर्स इन पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासात शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरस सुरुवातीला श्वसनप्रमाणीला संक्रमित करतो, त्यानंतर पेशींमध्ये तो झपाट्यानं वाढतो आणि गंभीर प्रकरणांमध्ये रोगप्रतिकारक क्षमतेला अतिसक्रिय करतो हे टप्प्याटप्प्यानं सांगितलं आहे.
नुकतंच भारतात कोरोना रुग्णांच्या मृत्यूबाबत (corona patient death) नवीन नियमावली तयार करण्यात आली. ज्यात कोरोना रुग्णाचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला हे डॉक्टरांना नमूद करावं लागणार आहे.
त्यांना श्वसन समस्या होती, हृदयाची समस्या होती की इतर आणखी काही कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला याचा उल्लेख डॉक्टरांना रिपोर्टमध्ये करावा लागणार. त्यात आता कोरोना रुग्णांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे होतो आहे, याबाबत मोठी माहिती समोर येत आहे.
“साइटोकाइम स्टॉर्म पांढऱ्या रक्तपेशी अतिसक्रिय होण्याची स्थिती आहे. या स्थितीत साइटोकाइनची रक्तात भरपूर मात्रेत निर्मिती होते.
साइटोकाइन वेगानं विकसित झाल्यानं लिम्फोसाइट आणि न्यूट्रोफिलसारख्या प्रतिरक्षा पेशींना आकर्षित करतात. ज्यामुळे या पेशी फुफ्फुसातील टिश्यूंमध्ये प्रवेश करतात आणि फुफ्फुसांना हानी पोहोचवतात”, असं लियू यांनी सांगितलं.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com