Maharashtra News : निवडणुका जवळ आल्या की आरक्षणाच्या मागण्या वाढतात. धनगर समाज व गोपीचंद पडळकर सरकारवर दबाव आणू पाहात आहेत; मात्र आदिवासी आरक्षणाला धक्का लागला,
तर असहकार आंदोलन करून मुंबईला जाणारे पाणी व रस्ते बंद करण्यात येऊन राज्यातील विविध पक्षातील सर्व २५ आमदार एकत्रित राजीनामा देतील असा इशारा देऊन धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे त्यांना आदिवासींमध्ये घेऊ नये, अशी मागणी अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केली आहे.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/10/ahmednagarlive24-Ahmednagarlive24-62.jpg)
धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण देण्यास विरोध करण्यासाठी आदिवासी समाजाने आदोलन सुरू केले आहे. त्याची सुरुवात काल अकोले शहरातून झाली. महात्मा फुले चौकातून मोर्चा काढण्यात आला.
आ. डॉ. किरण लहामटे व माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे तहसील कार्यालयाजवळ सभेत रूपांतर झाले. यावेळी आ.डॉ. लहामटे बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेते मारुती सांघींसह आदिवासी संघटनांचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉ. लहामटे म्हणाले. की ज्या आमदार गोपिचंद पडळकरांना बारामती मतदारसंघात त्यांच्याच धनगर समाजाने नाकारून पराभव केला ते आज धनगर समाजाची दिशाभूल करत आहेत. ते हेलिकॉप्टरमध्ये फिरतात, तर आमचा आदिवासी समाज डोगरदन्यात राहून हालाखीचे जीवन जगत आहे.
आदिवासी समाजाच्या चाली रिती वेगळ्या आहेत. समाजाने रोटी-बेटी व्यवहार यांच्याशी कधी केला का? आदिवासींना भारतरण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिले आहे. रंजल्या गंजलेल्या समाजाला दिलेल्या आरक्षणावर घाला घालण्याचा प्रयत्न सुरु आहे.
आम्ही ना. नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वाखाली २५ आदिवासी आमदारांची बैठक घेतली. आदिवासी आयोग स्थापन आहे. त्यात २५ आमदारांना विचारल्याशिवाय निर्णय होणार नाही. सरकारने धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, तर प्रसंगी सर्व २५ आदिवासी आमदार सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेतील, असे ते म्हणाले.
यावेळी मारुती मेंगाळ यांनी ९ ऑगस्टच्या आदिवासी जयंतीवर बोलणाऱ्यांना खडे बोल सुनावत पुढील वर्षीचा सण वादीपेक्षाही मोठा कर. याबद्दल पोटात दुखण्याचे कारण काय? भाजपा सरकार आदिवासींच्या आरक्षणावर चाला चालत आहे.
त्यासाठी समाजातील सर्वानी एकत्र आले पाहिजे. पूर्वी आदिवासी समाजासाठी मंत्रीपदाचा राजिनामा देणारे मधुकरराव पिचड आज काही बोलत नाहीत. भाजपने काँग्रेसमुक्तचा नारा दिला होता,
मात्र असेच सुरु राहिले तर भाजपमुक्त भारत कायला वेळ लागणार नाही सरकारने धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण दिले तर राज्यात समाजावर उतरेल, असा दावा मेंगाळ यांनी केला.