Maharashtra News : अपघाताच्या मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीत. समृद्धी महामार्गावरील अपघाताची घटना ताजी असतानाच आणखी एका अपघाताचे वृत्त आले आहे. जुन्नर तालुक्यातील कल्याण-अहमदनगर महामार्गावर पिंपळगाव फाटा परिसरात भीषण अपघात घडला.
फॉर्च्युनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की तिघे गंभीर जखमी झाले. त्यापैकी योगेश भारमळ याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर यातील जखमी काळू भारमळ हे कोमात गेले. रंजना भारमळ याना अनेक ठिकाणी फॅक्चर झाले आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/10/ahmednagarlive24-Ahmednagarlive24-2-3.jpg)
नेमकी घटना काय घडली ?
जुन्नरच्या पिंपळगाव फाटा परिसरात हा अपघात झाला. चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. योगेश भारमळ, काळू भारमळ आणि रंजना भारमळ अशी जखमींची नावे आहेत.
अपघातानंतर काळू भारमळ हे कोमात गेले, तर रजंना भारमळ यांचे पाय अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले. योगेश भारमळ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पुण्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पैशांअभावी उपचारांना उशीर?
अपघात झाल्यानंतर या अपघात ग्रस्तांना उपचारासाठी दवाखान्यात हलवले होते. अपघातग्रस्त कुटुंब गरीब असून मजुरी करत होते. हातावर पोट असणार हे कुटुंब होत. पैशांअभावी उपचारांना उशीर झाला.
त्यापैकी एकाला आपला जीव गमवावा लागल्याचे वृत्त समोर येत आहे. आमच्या पेशंटला पैशांअभावी उपचार मिळण्यास उशीर झाला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबातील इतर सदस्यांनी केला.
घटनेने खळबळ
अपघाताची घटनाच एकदम भीषण होती. परंतु पैशांअभावी उपचार न भेटणे हे त्यापेक्षा भीषण होते. पैसे नसल्याने उपचार करण्यास उशीर झाल्याचा व त्यामुळे रुग्णाचा जीव गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. माणुसकीपेक्षा पैसे मोठा आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे.