Immunity Booster Home Remedies : हवामान बदलताच बऱ्याच जणांना सर्दी, खोकला यांसारख्या समस्या जाणवतात, या समस्या रोगप्रतिकारक कमकुवत असल्यामुळे उद्भवतात.
पण तुम्ही जर आधीच सावध राहिल्यास, तुम्हाला खोकला, सर्दी, घसा खवखवणे, जडपणा, नाक वाहणे आणि ताप यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. खासकरून हिवाळ्याच्या मोसमामात यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. हिवाळा सुरु होताच बऱ्याच जणांना सर्दी कोरडा खोकला यांसारख्या समस्या जाणवतात.

अशा परिस्थितीत आधीच सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते अशा लोकांमध्ये हिवाळ्यात हे आजार जास्त दिसतात. त्यामुळे या हिवाळ्यात तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायची असेल तर काही घरगुती उपाय आहेत जे तुम्ही वापरू शकता. आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत, चला त्याबद्दल जाणून घेऊया.
बदाम
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी बदाम खूप उपयुक्त ठरतात. कारण बदामामध्ये व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तुम्ही रोज सकाळी भिजवलेले बदाम खाऊ शकता.
आवळा
आवळा प्रत्येक ऋतूमध्ये फायदेशीर मानला जातो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती निरोगी राहते. तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याची पावडर तसेच, आवळ्याचे पाणी पियू शकता. बाजारात तुम्हाला आवळ्याचा रस सहज मिळून जाईल, तुम्ही ते पाण्यात मिसळून त्याचे सेवन करू शकता.
लिंबू
लिंबू शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासही उपयुक्त ठरते. लिंबूमध्ये बायोफ्लेव्होनॉइड्स आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळतात, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. तुम्ही सकाळी लिंबू पाण्याचे सेवन करू शकता.
पाणी
हिवाळ्यात लोक पिण्याचे पाणी कमी करतात. त्यामुळे शरीरात पाण्याच्या कमतरतेची समस्या सुरू होते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती बिघडू लागते. त्यामुळे दररोज २ ते ३ लिटर पाणी पिणे खूप महत्वाचे आहे.
नियमित व्यायाम
या हंगामात प्रचंड थंडीमुळे लोक व्यायाम करणे बंद करतात. त्यामुळे मेटाबॉलिज्म कमी होऊन वजनही वाढू लागते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आणि चयापचय व्यवस्थित राहण्यासाठी व्यायाम करत करणे फार महत्वाचे आहे.
तुळस
तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी तुळशीचे सेवन खूप उपयुक्त ठरते. तुम्ही चहा किंवा इतर शीतपेयांसह तुळशीच्या पानांचा वापर केल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते.
इतर पदार्थ
तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवायची असेल तर तुम्ही आले, मध, सेलेरी, गूळ, लवंगा इत्यादींचा वापर करू शकता. यामुळे सर्दी इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो.