Havaman Andaj: अरबी समुद्रात चक्रीवादळ ? पाऊस पडणार का ? कशा पद्धतीचे राहू शकते सध्याचे हवामान? वाचा सविस्तर माहिती

Published on -

Havaman Andaj:- यावर्षी महाराष्ट्र मध्ये हवा तेवढा पाऊस न झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी खरीप पिकांचे खूप मोठे नुकसान झाले व पिके करपून गेली. यावर्षीच्या हंगामामध्ये जुलै आणि सप्टेंबर हे दोन महिने सोडले तर जून आणि ऑगस्ट यामध्ये पावसाने मोठा खंड दिल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले.

तसेच आता मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असून जवळजवळ संपूर्ण भारतातून मान्सून एक्झिट करण्याच्या तयारीत आहे. परंतु या पार्श्वभूमीवर आता अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होईल अशी शक्यता हवामानांकडून वर्तवली जात आहे. या सगळ्या अनुषंगाने सध्याचे हवामान कसे राहील? याबद्दल स्कायमेटने काय माहिती दिली आहे? याविषयी महत्त्वाची माहिती घेऊ.

 अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता

याबद्दलचे सविस्तर वृत्त असे की अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता हवामान तज्ञांकडून व्यक्त करण्यात आली असून यामुळे आग्नेय दिशेला चक्रीवादळ तयार होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामध्ये स्कायमेट या खाजगी हवामान मापन संस्थेने अशा प्रकारचा अंदाज वर्तवला असून

त्यांच्या अंदाजानुसार विचार केला तर भूमध्यरेषीय क्षेत्राच्या बाजूला  अरबी समुद्रामध्ये आग्नेय दिशेला कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून हिंदी महासागरातून जी काही गरम हवा येत आहे त्या सगळ्यांचा परिणाम यामध्ये होत असून लवकरच चक्रीवादळ तयार होणार आहे.

तसेच अलीकडील 72 तासांमध्ये अरबी समुद्राच्या दक्षिण मध्य क्षेत्रामध्ये असे वातावरण तयार झालं असून त्याला द्विधृव क्षेत्र असे म्हणतात. या क्षेत्रामुळेच ही परिस्थिती समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानावर परिणाम करते आणि त्यामुळे चक्रीवादळ तयार होऊ शकते.

हे चक्रीवादळ कशा स्वरूपाचे असेल याबद्दल माहिती देताना स्कायमेटने म्हटले आहे की हे सौम्य स्वरूपाचे असेल. कारण चक्रीवादळ तीव्र होण्यासाठी सध्या पर्यावरणाची स्थिती त्या दृष्टिकोनातून अनुकूल नाही.  त्यामुळे हे चक्रीवादळ सौम्य स्वरूपाचे असेल असा देखील स्कायमेट कडून अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News