अहमदनगर ब्रेकिंग : पाण्याच्या टाकीत विषारी द्रव ! हजारो लिटर पाणी ऐन पाणी टंचाईच्या काळात रस्त्यावर…

Published on -

Ahmednagar breaking : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील पिण्याच्या साठवण टाकीचे झाकण उघडून त्यामध्ये विषारी द्रव टाकल्याचा संशय आल्याने टाकीतील ८० हजार लिटर पाणी ऐन पाणी टंचाईच्या काळात रस्त्यावर सोडून देण्याची वेळ तिसगाव ग्रामपंचायतवर आली.

ज्या अज्ञात व्यक्तीने हा खोडसाळपणा केला, त्याच्या विरोधात तत्काळ पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिल्या आहेत.

तिसगाव येथील ग्रामसेवकाविरोधात तिसगावच्या सत्ताधारी गटाने आमदार तनपुरे, गटविकास अधिकारी डॉ. जगदिश पालवे यांच्याकडे गंभीर स्वरूपाच्या तक्रारी केल्या असून, या ग्रामसेवकाची तत्काळ इतरत्र बदली करण्यात यावी.

ग्रामसेवक गावाकडे लक्ष देत नाहीत, त्यांच्याकडे अनेक ग्रामपंचायतींचा चार्ज असून, ते पदाधिकाऱ्यांना व जनतेला चांगली वागणूक देत नाहीत, त्यांच्या दुर्लक्षामुळेच तिसगावकरांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

अशा तक्रारी माजी चेअरमन बाळासाहेब लवांडे, शबाना शेख, अमोल गारुडकर, ग्रामपंचायत सदस्य पंकज मगर, बिस्मिल्ला पठाण, प्रदीप ससाणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी या वेळी केल्या.

तिसगावमधील पिण्याच्या टाकीमध्ये विषारी द्रव टाकण्याचा प्रकार निश्चितच गंभीर असून, हा केलेला खोडसाळपणा निश्चितच चुकीचा आहे. पाणीटंचाईच्या काळात कोणी विषबाधा करण्याचा प्रयत्न करत असेल

तर अशा अज्ञात व्यक्तीविरोधात तत्काळ पोलिसात गुन्हा दाखल करून त्याचा तपास लावण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना करणार असल्याचे आ. तनपुरे यांनी या वेळी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News