Stock Market : शेअर बाजारातील अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न दिले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा शेअरबद्दल सांगणार आहोत ज्याने गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 205.23 टक्के परतावा दिला आहे.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे. म्हणजेच या शेअर्सने सहा महिन्यात पैसे डबल केले आहे.

कंपनीचे शेअर्स का वाढत आहेत?
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचे शेअर्स अजूनही तेजीतच आहेत. भारतीय तटरक्षक दलासाठी (आयसीजी) 310 कोटी रुपये खर्चून प्रशिक्षण जहाजांची निर्मिती आणि वितरणासाठी कंपनीने संरक्षण मंत्रालयासोबत करार केला असल्याने कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.
सहा महिन्यांत शेअर 200 टक्क्यांनी वधारला
सहा महिन्यांपूर्वी म्हणजे 18 एप्रिल रोजी कंपनीचा शेअर 716 रुपयांवर होता. याच कालावधीत हा शेअर 201.31 टक्के म्हणजेच 1,441.75 रुपयांनी वाढला. आज हा शेअर 2,157.95 रुपयांवर ट्रेड करत आहे. या शेअर्सचा 52 आठवड्यांच्या उचांकी स्तर 2,484.70 रुपये आहे. तर नीचांकी स्तर 612 राहिलेला रुपये आहे.
शेअरचा RSI किती आहे?
माझगाव डॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) 53.8 वर उभा आहे, जे सूचित करते की ते ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये व्यापार करत नाही.
जून तिमाहीत निव्वळ नफा किती होता?
माझगाव डॉकच्या एकत्रित निव्वळ नफ्यात जून तिमाहीत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत तो 224.8 कोटी रुपयांवरून 314 कोटी रुपयांवर गेला आहे. आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत परिचालनातून मिळणारा महसूल 2.6 टक्क्यांनी घटून 2,172.8 कोटी रुपयांवर आला आहे.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचा व्यवसाय काय आहे?
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड पूर्वी माझगाव डॉक लिमिटेड म्हणून ओळखली जात होती. मुंबई, माझगाव येथे ही शिपयार्ड कंपनी आहे. या कंपनीच्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर ते म्हणजे भारतीय नौदलासाठी युद्धनौका आणि पाणबुड्या तयार करते.
कंपनी ऑफशोर ऑइल ड्रिलिंगसाठी ऑफशोर प्लॅटफॉर्म आणि संबंधित सहायक जहाजे देखील तयार करते. कंपनीच्या मुख्य उपक्रमांमध्ये जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि ऑफशोर स्ट्रक्चर्सचे बांधकाम यांचा समावेश आहे.