भारतातील असं राज्य ज्याचे इस्रायलशी आहे खास कनेक्शन, तेथे बनवले जातात पोलिसांसह कैद्यांचे ड्रेस

Ahmednagarlive24 office
Published:

India News : इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. आता इराणही या लढाईत उघडपणे समोर आला आहे. इराणने आता उघडपणे हमासला पाठिंबा दिला आहे. पण तुम्हाला माहित आहे का की इस्रायली पोलिसांचे कपडे भारतातील केरळ राज्यात बनवले जातात.

इतकंच नाही तर केरळमधील या कारखान्यात कैद्यांचे गणवेशही बनवले जातात. हा व्यवसाय किती मोठा आहे? किती महिला काम करतात? चला याबद्दल जाणून घेऊयात

खरे तर फिलिस्तीनिच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या केरळ राज्याचे इस्रायलच्या सुरक्षा दलांशी व्यापारी संबंध आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष सुरू असताना केरळमधील कन्नूर येथील एका कपड्यांच्या कारखान्यातील कामगार एकजुटीने काम करत आहेत.

आठ वर्षांपासून सुरू आहे कामकाज

कन्नूरच्या कुथुपरंबा शहरातील मरीन हेड फॅक्टरी गेल्या आठ वर्षांपासून इस्रायली पोलिसांसाठी गणवेश तयार करत आहे. इस्रायलमध्ये अचानक आलेल्या या आपत्तीमुळे कारखान्याला आधीच गणवेश शिवण्यास सांगण्यात आले होते. अशा तऱ्हेने अहोरात्र काम सुरू आहे.

मॅरियन गारमेंट्सचे एमडी थॉमस ओलिकल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याला दरवर्षी १२ हजार ऑलिव्ह ग्रीन स्ट्रेच शर्ट आणि पँट गणवेशाची ऑर्डर मिळते. आता या युद्धजन्य वातावरणात या कारखान्याला लवकरात लवकर गणवेश पाठविण्यास सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत काम जोरात सुरू आहे.

पोलीस दलासाठी ऑर्डर प्राप्त झाली

या कारखान्याला इस्रायल पोलीस दलासाठी गणवेश बनवण्याच्या ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. मरियम गारमेंट्स ही कंपनी इस्रायली पोलिस दलासाठी नेव्ही ब्लू, स्काय ब्लू आणि फिकट हिरवा असे तीन प्रकारचे गणवेश बनवत आहे. या कारखान्याचे मुख्यालय मुंबईत आहे.

ही कंपनी जवळपास 2015 पासून इस्रायलसह अनेक देशांसाठी कपडे बनवते. इस्त्रायली पोलीस विभाग मेरियन गारमेंट्समधून गणवेश शिवत आहे. हे कापूस आणि पॉलिस्टर फॅब्रिक्स चे कपडे आहेत. एका अमेरिकन फर्मकडून स्पेशल पॉलिस्टर आयात करून त्यातून कपडे शिवले जातील अशी इस्रायलची अट आहे.

1 लाख 40 हजार गणवेशाची ऑर्डर

मेरियन गारमेंट्स दरवर्षी इस्रायलला सुमारे दीड लाख गणवेश पुरवतात. त्यापैकी एक लाख गणवेश पोलिसांसाठी तर 24 ते 40 हजार गणवेश कारागृहातील कैद्यांसाठी आहेत. याशिवाय कुवेत, कतार सुरक्षा दल, सौदी अरेबिया, फिलिपाईन्स आदी देशांच्या सुरक्षा दलांना हा कारखाना गणवेश पुरवतो.

कारखान्यात 1300 महिला कर्मचारी आहेत

या मरीन गारमेंट्स युनिटमध्ये सुमारे 1500 लोक आज काम करत आहेत. त्यात 1300 हून अधिक महिला सहभागी आहेत. या महिला इस्रायली सैनिक आणि कैद्यांचा गणवेश बनवतात. मल्याळी व्यापारी थॉमस ओलिकल हे या कारखान्याचे मालक आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe