Highway Rules: रस्त्यापासून किती अंतरावर घर बांधणे आहे सुरक्षित? वाचा नियम आणि टाळा भविष्यातील नुकसान

Ajay Patil
Published:
highways rule

Highway Rules:- स्वतःचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु घर बांधणीचा जर खर्च पाहिला तर तो गगनाला पोचला असल्यामुळे प्रत्येकालाच आपल्या स्वतःच्या स्वप्नातील घर बांधणे शक्य होते असे नाही. त्यातल्या त्यात घर बांधण्यासाठी ज्या काही जागेची निश्चिती केली जाते ती एक मोक्याची जागा म्हणून आपण त्या जागेची निवड करत असतो.

यामध्ये आपण बाजारपेठ, मुख्य म्हणजे रस्त्यालगत घर असणे खूप  प्रतिष्ठेचे किंवा एक भविष्यकालीन फायद्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे समजतो. यामध्ये रस्त्यालगत घर बांधण्याच्या बाबतीत ग्रामपंचायत असो किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण किंवा राज्य रस्ते विकास महामंडळ यांचे काही नियम असतात व या नियमांना धरूनच जर घराचे बांधकाम केले असेल तर भविष्यकालीन होणारे नुकसान टाळता येते.

नाहीतर आपण पाहतो की बऱ्याचदा नियम डावलून जर घर बांधले गेले असेल तर रस्त्याच्या विस्तारीकरण किंवा इतर काही कामांमुळे अतिक्रमणाच्या नावाखाली ते घर पाडले जाते व मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. या दृष्टिकोनातून रस्त्यालगत घर बांधण्याच्या बाबतीत नेमके काय नियम आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

रस्त्यालगत घर बांधण्याबाबत काय आहेत नियम?

रस्त्यालगत आपल्याला घर बांधता येते. परंतु त्या बाबतीत सगळे नियम व्यवस्थित समजावून घेऊन निर्णय घेणे गरजेचे असते. याबाबत काही मीडिया रिपोर्टचा विचार केला तर प्रत्येक राज्यांमध्ये रस्त्याच्या लगत घर बांधण्यासाठी आवश्यक अंतराकरिता काही वेगवेगळे नियम आहेत व हे नियम नगरपालिका किंवा महापालिका ठरवत असते.

बऱ्याचदा यासंबंधीचे नियम हे राज्य सरकार आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तयार केले जातात. रस्त्यापासून घराचे अंतर नेमके किती असावे हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल तर तुम्ही महापालिका किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून संबंधित माहिती मिळवू शकतात.

पण तरीसुद्धा तुम्हाला रस्त्याच्या कडेला घर बांधायचं असेल तर रस्त्याच्या कडेला असलेली रस्त्याची रुंदी तुम्हाला माहीत करून घेणे गरजेचे आहे. यामध्ये संबंधित भूखंडावर सर्व संबंधित सरकारी विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतल्यानंतर विहित ऑफसेट त्याच्या मर्यादेवर टाकून घर किंवा व्यवसायिक इमारत बांधण्याचा नियम आहे.

साधारणपणे जर तुम्ही महामार्गाच्या लगत घर बांधणार असाल तर घराचा प्लॉट हा रस्त्यापासून कमीत कमी 75 फूट अंतरावर असावा असा नियम आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे सरकारच्या मते राष्ट्रीय महामार्ग किंवा राज्य महामार्गावरील रस्त्यांच्या मध्यभागी 75 फूट अंतर योग्य मानले जाते. दुसरे म्हणजे जिल्हा मार्ग म्हणजेच डिस्ट्रिक्ट रोड असेल तर साठ फूट आणि ऑर्डीनरी डिस्ट्रिक्ट रोड मध्ये 50 फूट घर बांधणे हे नियमाला धरून समजले जाते. रस्त्यापासून वर उल्लेख केलेले अंतर सोडल्यानंतर तुम्ही बांधकाम करू शकतात.

 किती परिघामध्ये(त्रिज्येमध्ये) घर बांधता येत नाही?

शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार महामार्गाच्या मध्यभागी 75 ते 75 मीटरच्या परिघात कोणतेही बांधकाम करता येत नाही. परंतु यामध्ये बांधकाम जर महत्त्वाचे असेल तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग मंत्रालयाची परवानगी घेणे गरजेचे असते. राष्ट्रीय महामार्ग नियंत्रण कायद्याच्या कलम 42 नुसार नवीन प्रणालीमध्ये महामार्गाच्या मध्यापासून 40 मीटर पर्यंतच्या बांधकामाला अजिबात परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe